विचार करणे ही माणसाची तशी नैसर्गिक प्रवृत्ती. त्यामुळे प्रत्येक माणूस हा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे विचार करत असतोच. मग ते शिक्षणाविषयी असतील, मुलांच्या संगोपनाविषयी असतील किंवा स्वतः च्या उपजीविकेविषयी असतील. प्रत्येक माणूस विचार करत असतो पण फार थोडीच माणसे विचार करून सुखी व समाधानी झालेली दिसतात. असे का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना मला असे जाणवले की केवळ विचार करणे व त्या विचारांच्या आधारावर कृती करणे, ही प्रक्रिया पुरेशी नाही. तर सगळ्यात महत्वाचे आहे, ते म्हणजे तुमच्या अनुभव विश्वाचा आवाका वाढवणे, ज्यामुळे तुमचे विचार समृद्ध होतील व कृती करताना तुम्ही कल्पनाही केली नसेल असे अनोखे पर्याय तुमच्याकडे असतील. पण हे नक्की असेच आहे का, हे समजून घेण्यासाठी मी यु ट्यूब च्या मदतीने थेट उत्क्रांती पासून सुरुवात करायचे ठरवले. त्यामुळे मला आवाका वाढवता आलाच, शिवाय काही गोष्टींची उत्तरे मिळत आहेत, असे वाटू लागले. त्या अनुभवावर आधारित मी माझी निरीक्षणे दोन भागात माझ्या ब्लॉगवर मांडायचे ठरवले. मला माहिती नाही की हा विषय थेट शिक्षणाशी किंवा पालकत्वाशी संबंधि...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.