Skip to main content

सुरुवात - शिकण्याच्या मुळाशी जाण्याची - भाग १





विचार करणे ही माणसाची तशी नैसर्गिक प्रवृत्ती. त्यामुळे प्रत्येक माणूस हा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे विचार करत असतोच. मग ते शिक्षणाविषयी असतील, मुलांच्या संगोपनाविषयी असतील किंवा स्वतः च्या उपजीविकेविषयी असतील.

प्रत्येक माणूस विचार करत असतो पण फार थोडीच माणसे विचार करून सुखी व समाधानी झालेली दिसतात. असे का?

या प्रश्नाचे उत्तर शोधताना मला असे जाणवले की केवळ विचार करणे व त्या विचारांच्या आधारावर कृती करणे, ही प्रक्रिया पुरेशी नाही. तर सगळ्यात महत्वाचे आहे, ते म्हणजे तुमच्या अनुभव विश्वाचा आवाका वाढवणे, ज्यामुळे तुमचे विचार समृद्ध होतील व कृती करताना तुम्ही कल्पनाही केली नसेल असे अनोखे पर्याय तुमच्याकडे असतील.

पण हे नक्की असेच आहे का, हे समजून घेण्यासाठी मी यु ट्यूब च्या मदतीने थेट उत्क्रांती पासून सुरुवात करायचे ठरवले. त्यामुळे मला आवाका वाढवता आलाच, शिवाय काही गोष्टींची उत्तरे मिळत आहेत, असे वाटू लागले.

त्या अनुभवावर आधारित मी माझी निरीक्षणे दोन भागात माझ्या ब्लॉगवर मांडायचे ठरवले.

मला माहिती नाही की हा विषय थेट शिक्षणाशी किंवा पालकत्वाशी संबंधित आहे किंवा नाही. त्याचे उत्तर कदाचित दुसऱ्या भागाच्या शेवटी मिळू शकेल.

मी कोण आहे, माझे मूळ कुठे आहे, माझे इथे असण्याचे प्रयोजन तरी काय आहे?

आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर किंवा अनेक टप्प्यावर हा प्रश्न जसा अनेकांना छळत असतो, तसा तो मलाही छळत होता व आहे. गेल्या काही दिवसात हा प्रश्न मला अधिकच तीव्रतेने छळू लागला. 

मग या प्रश्नाचे उत्तर शोधायचा मी प्रयत्न सुरू केला. उत्तर शोधण्याचा प्रवास मला थेट उत्क्रांतीच्या वाटेवर घेऊन गेला. या वाटेवरून चालताना, मला जे उमजू लागले आहे व जी प्रक्रिया अजूनही अपूर्ण आहे, ती कुठेतरी लिहून ठेवावी, म्हणून हा लेखन प्रपंच.

उत्क्रांतीच्या वाटेवरून चालताना, मला ही वाट सध्याच्या भाषेत सांगायचे झाले तर दोन लेनच्या रस्त्यासारखी जाणवली. एक लेन जैविक उत्क्रांतीची तर दुसरी लेन सामाजिक उत्क्रांतीची. 

जैविक उत्क्रांतीच्या लेन मधून चालता चालता मला हे समजले की माझे किंवा आपल्या सगळ्यांचे मूळ ४० लाख वर्षांपूर्वी, वातावरणातील बदलांच्या रेट्याने दोन पायावर उभे रहात झाडावरून जमिनीवर उतरलेल्या Australopithecus पर्यंत जाऊन पोहोचते. त्यानंतर अन्नाच्या शोधात भटकंती करणाऱ्या Neanderthals या आपल्या पूर्वजांनी कदाचित मानवजातीचा प्रवास जैविकदृष्ट्या पुढे रेटला. त्यांच्या मदतीला अर्थात अनेक इतर जैविक टप्पे व त्या टप्प्या त वावरलेले आपले पूर्वज होतेच.

मधल्या लाखो वर्षात हळूहळू जैविकदृष्ट्या आपण अधिक प्रगत होत, आपले मूळ ज्यांच्याशी अधिक घट्ट जोडले गेले त्या Homosepian च्या रुपात ७० हजार वर्षापूर्वी या पृथ्वीवर वावरू लागलो.

मी मध्येच थोडी लेन बदलून सामाजिक उत्क्रांतीच्या लेन मधून जाऊ लागलो. ही लेन सुरुवातीला अगदीच खडबडीत म्हणजे सध्याच्या प्रगत काळातील रस्त्यांसारखी खड्डयांनी व्यापलेली व त्यामुळे अर्थातच संथ  व विस्कळीत जाणवली. चाळीस लाख वर्षांपूर्वी दोन पायावर उभे राहिल्यानंतर जवळपास ३९ लाख ९० हजार वर्षे आपण भटकत भटकत केवळ दहा हजार वर्षापूर्वी आपण सामाजिक उत्क्रांतीच्या पायवाटेचे एक मोठ्या लेन मध्ये रूपांतर केले.

सामाजिक उत्क्रांतीची पायाभरणी अर्थातच भटकंती कमी करून शेती करायला, अन्न साठवण्याच्या प्रक्रियेतून झाली. जीवन स्थिर झाले, त्यामानाने सुरक्षित झाले, प्रजनन दर वाढला. सतत एकत्र राहिल्याने संवाद वाढू लागला, त्यातून नव्या कल्पना जन्माला येऊ लागल्या, नवी क्षितिजे शोधायला सुरुवात झाली. त्यातून नव्या वसाहती उभ्या राहू लागल्या.

या वसाहतींच्या आजूबाजूला असलेला निसर्ग, त्याचे काळानुसार होत गेलेले आकलन यानुसार काही रूढी परंपरा, आहार, संपत्तीची वाटणी, स्त्री व पुरुष यांचे समाजातील स्थान व मुलांचे संगोपन करण्याचे विविध मार्ग स्वीकारले. प्रत्येक मार्गाची एक एक संस्कृती तयार झाली.

पुढे काय झाले, याचा अंदाज तुम्हाला आला असेलच.

या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर मला असे वाटू लागले आहे की जैविक उत्क्रांतीच्या लेन वरून चालताना मला, तू कोण आहेस असे विचारले, तर मी Himosepian आहे असे मी सांगेन. सामाजिक उत्क्रांतीच्या लेन मधून जाताना मला हाच प्रश्न विचारला तर निसर्गाच्या मदतीने जगता जगता तंत्रज्ञान वापरून मला स्वतःला, माझ्या कुटुंबाला व शक्य झाले तर माझ्या आजूबाजूच्या समाजाला माझ्या परीने आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणारा, त्यासाठी वातावरण व तंत्रज्ञान यांच्यामुळे होणारे बदल समजून घेत उत्क्रांतीच्या वाटेवर पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करणारा मी एक homosepian आहे.

एवढी ओळख मला पुरेशी आहे का नाही, हे मला आत्ता तरी सांगता येणार नाही. पण मला आता अधिक हलके वाटत आहे तसेच माझा आत्मविश्वास वाढला आहे.

पुढच्या भागात मी या सगळ्या प्रक्रियेत नक्की कोणत्या प्रेरणा मला उमगल्या, हे मांडायचा प्रयत्न करेन.
©चेतन एरंडे.

Comments

  1. फारच छान सुरुवात. ही सुरुवात तुम्हाला पुढे कशा प्रकारे घेऊन गेली हे वाचण्यास उत्सुकता आहे.

    ReplyDelete
  2. Chetan Sir. Happy to see that we are walking the same road in same direction. I strongly recommand you to read 'Sapiens', a book by Yuval Nova Harari. You will find an agreeable narrative of Human History-both biological and cultural.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...