काही दिवसांपूर्वी आपण सगळेच एका बातमीने उत्साहित झालो होतो, ते म्हणजे जगातील काही बलाढ्य कंपन्यांनी इथून पुढे नोकरी देताना मार्कलिस्ट किंवा सर्टिफिकेट नसतानाही नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. काही विद्यापीठे सुद्धा मार्कलिस्ट न बघता उच्च शिक्षणासाठी प्रवेश देऊ लागली आहेत. ही आनंदाची बातमी आहे, हे नक्की. किंबहुना सध्या मार्क बघून नोकरीसाठी मुलाखतीला बोलावलेल्या अनेक उमेदवारांकडून अनेक कंपन्यांची जी निराशा होत आहे, त्यामुळे अनेक जण भविष्यात असे निर्णय घेऊ लागतील, हेही खरे आहे. मात्र मार्कलिस्ट किंवा सर्टिफिकेट नसताना नोकरी कुणाला द्यायची, किंवा विद्यापीठात प्रवेश कसा द्यायचा हे त्या कंपन्या व विद्यापीठे कसे ठरवतील, हे बघणे अत्यंत महत्वाचे आहे. मार्कलिस्ट व सर्टिफिकेटच्या मदतीने गुणवत्ता सिद्ध करणे, हे तसे खूपच सोपे आहे. त्यासाठी लागणारी व्यवस्था मागच्या शंभराहून अधिक वर्षे चालवली जात आहे. त्यामुळे पालकांच्या व मुलांच्या व नोकरीसाठी अर्जाची पडताळणी करणाऱ्यांना ती चांगलीच अंगवळणी पडली आहे. या पलीकडे जाऊन गुणवत्ता सिद्ध याचा मात्र आपल्याला पहिल्या पासून विचार करावा लागेल त्या...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.