काही दिवसांपूर्वी आपण
सगळेच एका बातमीने उत्साहित झालो होतो, ते म्हणजे जगातील काही बलाढ्य कंपन्यांनी
इथून पुढे नोकरी देताना मार्कलिस्ट किंवा सर्टिफिकेट नसतानाही नोकरी देण्याचा
निर्णय घेतला आहे. काही विद्यापीठे सुद्धा मार्कलिस्ट न बघता उच्च शिक्षणासाठी
प्रवेश देऊ लागली आहेत.
ही आनंदाची बातमी आहे, हे
नक्की. किंबहुना सध्या मार्क बघून नोकरीसाठी मुलाखतीला बोलावलेल्या अनेक
उमेदवारांकडून अनेक कंपन्यांची जी निराशा होत आहे, त्यामुळे अनेक जण भविष्यात असे
निर्णय घेऊ लागतील, हेही खरे आहे. मात्र मार्कलिस्ट किंवा सर्टिफिकेट नसताना नोकरी
कुणाला द्यायची, किंवा विद्यापीठात प्रवेश कसा द्यायचा हे त्या कंपन्या व
विद्यापीठे कसे ठरवतील, हे बघणे अत्यंत महत्वाचे आहे.
मार्कलिस्ट व
सर्टिफिकेटच्या मदतीने गुणवत्ता सिद्ध करणे, हे तसे खूपच सोपे आहे. त्यासाठी
लागणारी व्यवस्था मागच्या शंभराहून अधिक वर्षे चालवली जात आहे. त्यामुळे
पालकांच्या व मुलांच्या व नोकरीसाठी अर्जाची पडताळणी करणाऱ्यांना ती चांगलीच
अंगवळणी पडली आहे. या पलीकडे जाऊन गुणवत्ता सिद्ध याचा मात्र आपल्याला पहिल्या पासून
विचार करावा लागेल त्याची आत्तापासून तयारी करावी लागेल.
ही तयारी केवळ नोकरी
मिळवण्यासाठी नाही तर व्यवसाय करायचा असेल तर भांडवल मिळवण्यासाठी सुद्धा आवश्यक
आहे. त्याचबरोबर होमस्कुलिंग करत असताना जवळ भरपूर मोकळा वेळ असल्याने मुले नवनवीन
गोष्टी करत असताना, नवीन ठिकाणे बघत असतात, नवीन लोकांना भेटत असतात, वेगवेगळ्या
कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. या सगळ्यामधून ही मुले काही न काही ग्रहण करत
असतात. त्यांच्या आकलनाप्रमाणे त्यातून त्यांना सुचलेल्या कल्पना देखील मांडत
असतात.
या सगळ्या कल्पना व त्याचे
आकलन, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी मुलांनी केलेले प्रयत्न, त्याचे दिसलेले
परिणाम, हे कोणत्या तरी प्रकारे नोंदवून ठेवावे लागतील. लिहायचा कंटाळा असेल, तर
व्हिडिओ, ऑडीओ किंवा अगदी चित्रातून नोंदवले तरी चालेल. याचा फायदा सातत्य
राखण्यासाठी तसेच आधी शिकलेल्या , समजलेल्या गोष्टी पुढचे प्रयत्न करताना वापरता
येऊ शकतील.
हे सगळे कसे प्रत्यक्षात
आणण्याचे याविषयी अजूनही आम्ही विचारमंथन करत आहोत. प्रवास, प्रयोग, वाचन, चर्चा,
कार्यक्रम या सगळ्याची नोंद करण्यासाठी काही format करता येईल का? हे फॉरमॅट आपल्याला सगळ्यांना एकत्र चर्चा करून ठरवता येईल
का, याचा विचार करावा लागेल. याआधी अशा प्रकारचे डॉक्युमेंटेशन कुणी केले आहे, याचा
शोध घ्यावा लागेल. तसेच मार्कलिस्ट व सर्टिफिकेटच्या ऐवजी गुणवत्ता सिद्ध
करण्यासाठी कोणत्या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात, याचा पुढचे काही दिवस आपण सगळे
मिळून शोध घेणार आहोत.
याविषयी तुमच्या काही सूचना
असतील तर तुम्ही chetanerande@gmail.com
वर नक्की कळवा.
©चेतन एरंडे.
I read about the same thing of Malvika Raj Joshi I saw interview of her Mother where she told that she and her daughter used to do writing about what there daughter does for the day. They keep that record which they showed to MIT in her admission process.
ReplyDelete