कोणत्याही होमस्कूलरला हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे "तुझे दिवसभराचे टाईमटेबल काय असते?" कोणताही होमस्कूलर खरे तर या प्रश्नाने पहिल्यांदा गडबडूनच जातो. मग वेळ मारून नेण्यासाठी म्हणून काहीतरी थातूरमातुर उत्तर देऊन स्वत:ची सुटका करून घेतो. मूल जेमतेम तीन वर्षाचे झाले रे झाले की आपण त्याला एक शेड्यूल देऊन त्याला दिवसभर कुठे ना कुठे गुंतवून ठेवायचा प्रयत्न सुरु करतो. मग हे गुंतवणे प्री स्कूल मध्ये असेल, डे केअर असेल, ग्राउंड असेल किंवा क्लासेस असतील. मूल जसजसे मोठे होत जाते, तसतसे हे शेड्यूल अधिक भरगच्च होऊ लागते. शेड्यूल जितके भरगच्च तितकी मूल शिकण्याची ग्यारंटी जास्त , असे एक समीकरण आपण मनाशी पक्के करून टाकले आहे. होमस्कूलिंग करणाऱ्या मुलांना शाळा नाही, परीक्षा नाही त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे कसे होणार? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतोच. त्यामुळे किमान त्यांचे टाईमटेबल समजून घेतले आणि जर का ते भरगच्च किंवा फिक्सड वगैरे आहे, असे समजले, तर "भरगच्च किंवा आधीच ठरवलेल्या दिनक्रमामुळे का होईना, ही मुले शिकतात" अशी त्यांना खात्री करून घ्यायचे अस...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.