शिक्षणाचे "हे" चार प्रवाह समजून घेत "हार्वर्ड संशोधनाच्या" आधारे सध्याचा शिक्षणाचा गोंधळ कसा कमी करता येईल?
कुणीही कल्पना न केलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सध्या शिक्षणक्षेत्रात एकूणच गोंधळ उडाला आहे. हा गोंधळ कमी करता येईल का? मी नुकताच हार्वर्ड विद्यापीठाचा "लीडर्स ऑफ लर्निंग" हा ऑनलाईन कोर्स करायला सुरुवात केली आहे. या कोर्समधून मला शिक्षणाचे जे मूलगामी प्रवाह समजले, त्या अनुषंगाने हा गोंधळ कसा कमी करता येईल, याविषयी माझे मत मांडण्याचा प्रयत्न मी या ब्लॉगपोस्ट मध्ये करत आहे. हार्वर्ड विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार शिकण्याच्या पद्धतीचे एकूण चार प्रकारात वर्गीकरण केले आहे. १. Hierarchical Individual (श्रेणीबद्ध - वैयक्तिक) या प्रकारात पारंपरिक शाळा व पारंपरिक पद्धतीने दिले जाणारे शिक्षण येते. या प्रकारात शिक्षण हे कुठंतरी साठवून ठेवले आहे, श्रेणीबद्ध आहे व ते टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्याला दिले जाते. त्यामुळे इथे इयत्ता, वर्ग व क्रमिक पुस्तके यांना अतिशय महत्व आहे. शिक्षण घेणे ही इथे विद्यार्थ्याची वैयक्तिक जबाबदारी मानली जाते. उदाहरणार्थ - पारंपारिक शाळा २. Hierarchical Collective (श्रेणीबद्ध - सामूहि...