Skip to main content

शिक्षणाचे "हे" चार प्रवाह समजून घेत "हार्वर्ड संशोधनाच्या" आधारे सध्याचा शिक्षणाचा गोंधळ कसा कमी करता येईल?


कुणीही कल्पना न केलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सध्या शिक्षणक्षेत्रात एकूणच गोंधळ उडाला आहे. हा गोंधळ कमी करता येईल का?



मी नुकताच हार्वर्ड विद्यापीठाचा "लीडर्स ऑफ लर्निंग" हा ऑनलाईन कोर्स करायला सुरुवात केली आहे. या कोर्समधून मला शिक्षणाचे जे मूलगामी प्रवाह समजले, त्या अनुषंगाने हा गोंधळ कसा कमी करता येईल, याविषयी माझे मत मांडण्याचा प्रयत्न मी या ब्लॉगपोस्ट मध्ये करत आहे. 

हार्वर्ड विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार शिकण्याच्या पद्धतीचे एकूण चार प्रकारात वर्गीकरण केले आहे.

१.  Hierarchical Individual (श्रेणीबद्ध - वैयक्तिक)



या प्रकारात पारंपरिक शाळा व पारंपरिक पद्धतीने दिले जाणारे शिक्षण येते. या प्रकारात शिक्षण हे कुठंतरी साठवून ठेवले आहे, श्रेणीबद्ध आहे  व ते टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्याला दिले जाते. त्यामुळे इथे इयत्ता, वर्ग व क्रमिक पुस्तके यांना अतिशय महत्व आहे. शिक्षण घेणे ही इथे विद्यार्थ्याची वैयक्तिक जबाबदारी मानली जाते. 

उदाहरणार्थ - पारंपारिक शाळा 

२.  Hierarchical Collective  (श्रेणीबद्ध - सामूहिक)



या प्रकारात पारंपरिक शिकण्याच्या पद्धतीत थोडेसे बदल करून, मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अभ्यासक्रम व शिक्षक यांच्या पलीकडे जाऊन समाजाच्या भूमिकेचा देखील विचार केला जातो. त्यामुळे समाजातील वेगवेगळे विषयातील तज्ज्ञ शाळेत येतात. 

त्याचबरोबर मुलांना देखील फक्त "ऐकण्याची भूमिका" न देता त्यांना "गट चर्चा" असेल किंवा "प्रकल्प" असेल यांतून एकत्र काम करण्याची संधी दिली जाते. या प्रकारात शिक्षण जरी श्रेणीबद्ध पद्धतीने दिले जात असले तरी शिकण्याची जबाबदारी सामूहिक आहे असे मानले जात असल्याने एकत्रित काम करण्यावर भर असतो.

उदाहरणार्थ - प्रयोगशील  शाळा   

३. Distributive Individual (विस्तारित वैयक्तिक) 



ज्ञान हे श्रेणीबद्ध नसून ते सगळीकडे विस्तारलेले आहे असे मानणारी मंडळी या प्रकारात येतात.
हा प्रकार अगदी अलीकडे आलेला जरी असला तरी त्याचा प्रसार वेगाने  होत आहे. 

या प्रकारात काय शिकायचे?कुणाकडून शिकायचे? कधी शिकायचे या सगळ्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला असते. मग मुले ऑनलाईन शिकतील किंवा " ऑफलाईन गुरुची" स्वतःहून निवड करतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे काय शिकायचे? हे मुलांनी ठरवलेले असल्याने "अरे शिका रे" असा तगादा विद्यार्थ्यांच्या मागे लावायची गरज पडत नाही!!

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या प्रकारचे शिक्षण हे खऱ्या अर्थाने  "लोकशाहीवादी" शिक्षण आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार येणाऱ्या काळात याच प्रकारच्या शिक्षणाचा बोलबाला असेल, असे मानले जाते.

उदाहरणार्थ - होमस्कूलिंग - ऑनलाईन/डिजिटल लर्निंग 
 
४. Distribute Collective (विस्तारित सामूहिक)



हा प्रकार "विस्तारित वैयक्तिक" चा प्रकारचा पुढचा भाग आहे. या प्रकारामध्ये लोकशाही पद्धतीने स्वतःहून  शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक नेटवर्क तयार केले जाते, या नेटवर्कच्या माध्यमातून विद्यार्थ्याला अनेक "गुरु" व शिकण्याचे अनेक "पर्याय" उपलब्ध होतात .

लोकशाही पद्धतीनेच पण एकट्याने शिकण्यापेक्षा वेगवेगळे समूह बनवून शिकण्याकडे ज्यांचा कल असतो, त्या व्यक्ती या प्रकारात पडतात.

उदाहरणार्थ - होमस्कूलिंग -  लर्निंग होम / लर्निंग स्पेस    

शिक्षणाच्या बाबतीत सध्याचे सरकारी धोरण बघितले तर जास्तीत जास्त प्रमाणात डिजिटल माध्यमांचा मग ते मिटिंग प्लॅटफॉर्म असतील, ऍप असतील किंवा अगदी टेलिव्हिजन असेल या सगळ्यांचा वापर करण्याकडे कल दिसतो. मात्र डिजिटल माध्यमे वापरताना शिक्षण मात्र "श्रेणीबद्ध" पद्धतीने म्हणजे पाठयपुस्तकांवर आधारित  देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे!

आपण जर शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून वरील चार प्रकारांचा विचार केला तर "श्रेणीबद्ध" म्हणजे पाठयपुस्तक वापरून दिलेले शिक्षण आणि "विस्तारित" म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन मुख्यतः डिजिटल माध्यमे वापरून दिलेले शिक्षण एकत्रित दिले जात नाहीत. (hierarchical आणि distributive हे दोन प्रकार कुठेच एकत्र वापरले जात नाहीत) याचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही डिजिटल माध्यम वापरता तेव्हा शिकण्याच्या प्रक्रियेचे नियंत्रण हे "शिकवणाऱ्याकडून शिकणाऱ्याकडे" जाते. शिकवणारा ऍप वापरून शिकायचं की व्हिडियो बघून तसेच  कोणाकडून आणि कधी शिकायचं? हे ठरवतो.

असे नियंत्रण विद्यार्थ्याकडे देण्याची आपली तयारी आहे का?

तसे नसेल तर मात्र आपण या भानगडीत न पडता "श्रेणीबद्ध सामूहिक" म्हणजेच hierarchical collective  या प्रकारचं वापर केला पाहिजे. आपला भर हा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून कमी करून विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला त्याला मदत करू शकतील असे समूहातील घटक निवडून मग ते निवृत्त शिक्षक असतील, कॉलेजमधील मुले असतील किंवा पालकांचे गट असतील यांच्यावर वाढवावा लागेल. हि मंडळी शाळेचे छोटे प्रारूप त्यांच्या गावात, वस्तीवर किंवा सोसायटीमध्ये उभे करू शकतील व तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने मुलांना "श्रेणीबद्ध शिक्षण" देऊ लागतील.


मात्र सरकारला जर कोरोनाची संधी घेऊन शिक्षण डिजिटल युगाशी जोडायचे असेल तर मात्र शिकण्याच्या प्रक्रियेचे संपूर्ण नियंत्रण हे विद्यार्थ्यांकडे देण्याची तयारी ठेवावी लागेल व एक वर्ष का होईना असा प्रयोग करून सकारात्मक बदल होतात का? हे तपासण्याच्या सुवर्णसंधीचा वापर करण्याची मानसिक तयारी करावी लागेल. 



सध्याच्या काळाचा विचार केला तर शिक्षणाविषयी जो  गोंधळ उडाला आहे तो शिकण्याच्या वरील चार प्रकारात, "एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात जाण्याची" समाजाची, शासनाची व पालकांची तयारी नसल्याने किंवा अशी तयारी करून न घेतल्याने किंवा या सगळ्या प्रकारांची /प्रवाहांची माहिती करून न घेतल्याने  होत आहे, असे मला वाटत आहे.

या चारही पैकी शिकण्याचा कोणता प्रकार चांगला आणि कोणता वाईट हे ठरवण्याचा खटाटोप न करत मुलांचा शिकण्याचा कल व आजूबाजूची परिस्थीती यांचा विचार करून एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात सहजपणे संचार करण्याची "लवचिकता" कशी निर्माण करायची, याचा सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे.

अशा "लवचिकतेमुळेच" माणूस म्हणून आपण उत्क्रांत होऊ शकलो, टिकून राहू शकलो, आत्ताच्या काळात सुद्धा हीच लवचिकता माणसाला टिकवून ठेवू शकेल असे मला खात्रीपूर्वक वाटते.

चेतन एरंडे. 

Comments

  1. सर, तुम्ही फारच छान, अभ्यासपूर्वक लिहिलंय. नैसर्गिक अशा लवचिकतेमुळेच मानव उत्क्रांत होत आहे. तेव्हा शिक्षणात जर ही लवचिकता नसेल, तर मानव निसर्गाविरुद्ध जाऊन स्वत:चाच घात करून घेणार हे स्पष्ट आहे. या विषयावर शिक्षणात जरूर विचारमंथन घडून यावे.

    ReplyDelete
  2. चेतन सर , खूपच छान . आपल्या समाजाची मानसिकता साचेबंद शिक्षणाकडे असल्यामुळे आपण सांगितलेले इतर पर्याय समाजाच्या ,पालकांच्या गळी उतरवणे फार कठीण आहे .यासाठी शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बदलणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  3. Considering the first approach, but with a little twist.. At some extent, the problem lies when the parents feel relaxed if the school is taking entire responsibility to `educate` their child and ideally, it should not be so! It is a collective effort by school, parents and society. Let our children be given an open eye to observe the surrounding and learn, apart from normal schooling.

    ReplyDelete
  4. माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक लेख 👍

    ReplyDelete
  5. आमचा अभ्यासाचाआराखडा बनवताना या लेखाचा फार फायदा होणार आहे. आभार.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...