Skip to main content

Posts

Showing posts from 2021

आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग १

  आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग १ मागच्या वर्षी आम्ही आमचा होमस्कूलिंगचा प्रवास लोकसत्ताचे चतुरंग पुरवणीत मांडला होता. सध्या अनेकजण होमस्कूलिंगविषयी विचारणा करत असल्याने हा लेख तीन ते चार भागात पुन्हा एकदा ब्लॉगवर पोस्ट करत आहे. तसेच या लेखाचे लवकरच माझ्या युट्युब चॅनेलवर वाचन करण्याचा देखील विचार आहे. त्याविषयी लवकरच पोस्ट करेन. " मला थ्रीडी डिझाईन आणि ऍनिमेशन करायला खूप आवडत , मला ते शिकायचंय " आमच्या तेरा वर्षाच्या मुलाने ,   स्नेहने हे सांगताच सुजाण भूमिकेत शिरून मी व प्रीती त्याच्यासाठी थ्रीडी डिझाईनचा क्लास शोधून काढला . मात्र स्नेहला त्या क्लासची सगळी माहिती देऊन , " तू हा क्लास करशील का ?" असे विचारताच त्याने ठाम नकार दिला . त्याचा नकार बघून आम्ही जरी हा विषय सोडून दिला तरी त्याने मात्र हा विषय सोडून दिला नव्हता ! तो झाडून कामाला लागला . जमतील तेवढे ऑनलाईन प्लँटफॉर्म पालथे घातले आणि ब्लेंडर नावाचे एक थ्रीडी डिझाईन सॉफ्टवेअर असते असा शोध लावला . नुसता शोध लावून तो थांबला नाही...