माणसाला किंवा खरं तर कोणत्याही सजीवाला सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती? याचा शोध घेतला तर निर्विवादपणे एकच उत्तर येईल, ते म्हणजे "स्वातंत्र्य". प्रत्येक सजीव जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करून आनंदाने, समाधानाने तेव्हाच जगू शकतो, जेव्हा तो त्याचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असतो. माणसाच्या सातत्याने चालणाऱ्या संघर्षाचे मूळ जर आपण बघितले, तर ते त्याच्या स्वातंत्र्याच्या झालेल्या संकोचात सापडते. माणूस त्याच्याही नकळत कधी गरजा वाढवून ठेवल्याने, खऱ्या गरजा ओळखता न आल्याने आर्थिक, सामाजिक पारतंत्र्यात अडकत जातो. नोकरीतून स्वातंत्र्य हवे असते पण कर्जाचे हप्ते बेडीचे काम करतात, शहरातील दगदगीने मन आणि शरीर थकून जाते, त्याला निसर्गातील मोकळ्या वातावरणाची ओढ लागते पण पुन्हा एकदा, नोकरी, व्यवसाय आणि मुलांच्या शिक्षणाच्या बेड्या आड येऊन, माणसाचे स्वातंत्र्य हिरावले जाते. माणसाच्या आयुष्यात घडणारे असे सगळे संघर्ष स्वातंत्र्य नसल्यानेच निर्माण होतात, हे नक्की. माणसाला शाश्वत समाधान व सुख मिळवून देऊ शकेल अशा स्वातंत्र्याचा पाया हा शिक्षणात आहे, असे मला वाटते. हे ...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.