Skip to main content

Posts

Showing posts from September, 2023

स्व अध्ययन -  आनंदी व समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली. 

माणसाला किंवा खरं तर कोणत्याही सजीवाला सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती? याचा शोध घेतला तर निर्विवादपणे एकच उत्तर येईल, ते म्हणजे "स्वातंत्र्य".   प्रत्येक सजीव जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करून आनंदाने, समाधानाने तेव्हाच जगू शकतो, जेव्हा तो त्याचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असतो. माणसाच्या सातत्याने चालणाऱ्या संघर्षाचे मूळ जर आपण बघितले, तर ते त्याच्या स्वातंत्र्याच्या झालेल्या संकोचात सापडते.   माणूस त्याच्याही नकळत कधी गरजा वाढवून ठेवल्याने, खऱ्या गरजा ओळखता न आल्याने आर्थिक, सामाजिक पारतंत्र्यात अडकत जातो. नोकरीतून स्वातंत्र्य हवे असते पण कर्जाचे हप्ते बेडीचे काम करतात,  शहरातील दगदगीने मन आणि शरीर थकून जाते, त्याला निसर्गातील मोकळ्या वातावरणाची ओढ लागते पण पुन्हा एकदा, नोकरी, व्यवसाय आणि मुलांच्या शिक्षणाच्या बेड्या आड येऊन, माणसाचे स्वातंत्र्य हिरावले जाते.  माणसाच्या आयुष्यात घडणारे असे सगळे संघर्ष स्वातंत्र्य नसल्यानेच निर्माण होतात, हे नक्की.  माणसाला शाश्वत समाधान व सुख मिळवून देऊ शकेल अशा स्वातंत्र्याचा पाया हा शिक्षणात आहे, असे मला वाटते. हे ...