Skip to main content

Posts

Showing posts from February, 2018

सर्जनशील पालकत्वाची सुरुवात...

पुढील लेख झी दिशा मध्ये नुकताच प्रसिध्द झाला होता. आमच्या सर्जनशील पालकत्वाच्या प्रवासाला सुरुवात नक्की झाली तरी कशी, हे मी या लेखातून मांडायचा प्रयत्न केला आहे. आधी सांगितल्याप्रमाणे होमस्कूलिंग व सर्जनशील पालकत्व या दोन्हीविषयी आम्ही लिहिणार आहोत, याचा हेतू, दोन्ही प्रवासाच्या वाटा जवळपास सारख्याच आहेत व एकमेकींशी गुंफल्या गेल्या आहेत,  हे वाचकांच्या लक्षात यावे हा आहे. सर्जनशील पालक होताना.. स्नेह, म्हणजे माझा मुलगा दोन किंवा तीन वर्षांचा होता, तेव्हा मी माझ्या नोकरीतील कामाच्या निमित्ताने सतत बाहेरगावी असायचो. त्यामुळे त्याची सगळी जबाबदारी प्रीतीने, म्हणजे त्याच्या आईनेच घेतलेली होती. (आत्ता सुद्धा बऱ्यापैकी  तिच्याकडेच आहे!) . सतत आईबरोबर असल्याने ती त्याची जवळची मैत्रीण होती. तर मी म्हणजे कधीतरी घरी येणारा आणि थोडे दिवस आपले लाड करून, म्हणजे नवीन वस्तू किंवा खाऊ देऊन, लगेचच परत निघून जाणारा माणूस अशी   त्याची समजूत झाली होती. त्याच्या मनातील काही सांगायचे असेल तर तो पटकन आईकडे जायचा आणि त्याला कुठली नवीन वस्तु किंवा खाऊ आणायचा असेल तरच माझ्याकडे यायचा....

म टा संवाद मधील होम स्कूलिंग वरील आमचा लेख

आम्ही होमस्कूलिंग करतो हे समजताच समोरच्या व्यक्तीकडून प्रश्नांची सरबत्ती सुरु होते. हा दिवसभर घरी नक्की काय करतो? हा परीक्षा कशी देतो ? सर्टिफिकेटचे काय? हा समाजात मिसळू शकतो का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्याच्या  करिअरचे काय?समोरची व्यक्ती जरी बदलली तरी साधारण प्रश्न तेच असतात. होमस्कूलिंग मधील "होम" शब्दामुळे बऱ्याच जणांची फसगत होते. ज्या प्रमाणे शाळेत मुले वेळापत्रकाला बांधलेली असल्यामुळे दिवसभर साधारण एकाच जागी बसून असतात, तशीच ही मुले घरात बसून राहतात कि काय, असा समज होऊ शकतो. मात्र होमस्कूलिंगचा मूळ उद्देश हा मुलांना शिकत असताना पुस्तकाच्या आणि वेळापत्रकाच्या  मर्यादा ओलांडता याव्यात हा आहे. कोणताही विषय शिकत असताना तो केवळ परीक्षेसाठी न शिकता त्या विषयातील संकल्पना व्यवस्थित समजून घेणे, त्यांचा दैनंदिन जीवनाशी स्वतःहून संबंध लावण्याचा प्रयत्न करणे हा शिक्षणाचा मूळ हेतू आहे असे मला वाटते. मुलांची मानसिक तयारी नसताना त्यांना कोणतातरी विषय केवळ वेळापत्रकात आहे म्हणून शिकवला, तर मुलाची त्या विषयातील गोडी कमी होऊ शकते व हे वारंवार होत राहिले तर, म...