भारतासारख्या लोकशाही देशातील नागरिक कसे आहेत, याचा फेसबुक हा आरसा समजला तर, "तुम्ही महाभारतातील कोणते पात्र आहात, तुमच्या नावाचा अर्थ काय, तुम्ही कधी मरणार, कमेंट मध्ये तुमच्या नावातील पहिली तीन अक्षरे लिहा व चमत्कार बघा" अशा पोस्टवर लाख्नोंच्या संख्येने तुटून पडणारे नागरिक बघितले की, झापड बांधून एखादा सांगेल, तसे वागणे हा या देशातील नागरिकांचा स्वभावधर्म आहे, हे कोणत्याही सुज्ञ माणसाच्या लगेच लक्षात येईल (म्हणजे तुमच्याही आपले असेलच!). आपल्या देशातील लोकशाही ही व्यवस्था जर अशा नागरिकांच्या भरवश्यावर राबविली जात असेल, तर वरून कितीही यशस्वी आणल्याचा आव आणला तरी ती एक पूर्णपणे फसलेली व्यवस्था आहे, हे आपण शांतपणे सिग्नलला उभे राहिलेले असताना, सर्व थरातील पुरुष व महिला आपल्या शेजारून सिग्नल तोडून जाताना बघितले की सहज लक्षात येते. ही व्यवस्था अयशस्वी होण्यामध्ये स्वतंत्र भारतातील पहिल्या सरकारपासून आत्ताच्या सरकारपर्यंत, प्रत्येकाने, लोक "सु"शिक्षित होणार नाहीत, प्रश्न विचारणार नाहीत, जे काही सुरु आहे, ते केवळ निमुटपणे नाही, तर देशप्रेमाचा भाग म्हणून स्वीकार...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.