Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018

होमस्कुलिंग (मुक्त शिक्षण, स्व-अध्ययन) परीक्षा, सर्टिफिकेट, अभ्यासक्रम याविषयी अधिकृत सरकारी माहिती

होमस्कुलिंग करायचे का? हा विचार सोबत घेऊन येतो, एक मोठ्ठा प्रश्न.. परीक्षांचे काय? परीक्षाच नसेल तर सर्टिफिकेट कसे मिळणार? सर्टिफिकेट नसेल तर नोकरी कशी मिळणार? खरे तर एकदा होमस्कुलिंगला सुरुवात केली की एक दोन वर्षाच्या अनुभवाने या प्रश्नांची उत्तरे आपोआपच  मिळतात. पण सुरुवात करताना मात्र मनात परीक्षा, सर्टिफिकेट व प्रचलित व्यवस्थेशी जुळवून घेण्याचे मार्ग याविषयी साहजिकच शंका असते. जर त्याविषयी अधिकृत माहिती मिळाली तर निर्णय घेणे सोपे जाते, हे नक्की. आम्हाला होमस्कुलिंग करण्याची मानसिक तयारी करत असलेल्या पालकांकडून जे प्रश्न वारंवार विचारले जातात, त्या सगळ्या प्रश्नांची अधिकृत उत्तरे एन. आय. ओ. एस. (NIOS) या भारत सरकारच्या मुक्त शिक्षण विषयी सर्वाधिकार असलेल्या संस्थेने विस्तृतपणे दिली आहेत. जर कुणाला होमस्कुलिंग करणाऱ्या मुलांचे प्रचलित व्यवस्थेत कसे होणार? हा प्रश्न छळत असेल, तर त्यांनी ही उत्तरे शांतपणे जरूर वाचावीत. तुमच्या मुलाची जर प्रचलित शिक्षणव्यवस्थेत घुसमट होत असेल, तर सुदैवाने त्याला हव्या त्या गतीने, कलाने व मर्जीने शिक्षण घेण्याची व माणूस म्हणून त्य...

आनंददायी शिक्षणाची इमारत

मागच्या काही दिवसातील मनात विचारांचे वादळ उठावे , असे तीन चार प्रसंग एकामागून एक माझ्या समोर आले. प्रसंग -१ लहान मुलांसाठी एका सोसायटीत आयोजित केलेल्या "खेळातून विज्ञान" या कार्यक्रमात जशी मुले रमली होती तशी मोठी माणसे सुद्धा रमली होती. विज्ञान इतक्या सोपे पद्धतीने शिकता येऊ शकते हे त्यांना नव्यानेच समजले. विज्ञानातील मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी मोठ्या प्रयोगशाळांची नाही तर इच्छाशक्तीची व वेळ देण्याची गरज आहे , हे पालकांच्या हळुहळु लक्षात येते आहे , असे मला जाणवले. प्रसंग -२ अकरा वर्षाचा सोनीत पुण्यातील बाणेर टेकडीवर पृथ्वीच्या जन्माची कहाणी पुराव्यानिशी आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगत होता. त्याच्याकडून मुलांना जशा नवीन गोष्टी समजत होत्या तशा आम्हाला पालकांना सुद्धा नव्यानेच समजत होत्या. कितीतरी वेळा त्या टेकडीच्या जवळ जाऊनही हे सगळे   नक्की कसे निर्माण झाले असावे , असा प्रश्न गेल्या चाळीस वर्षात आम्हाला कुणालाच कधी पडला नाही. मात्र तोच प्रश्न सोनीतला अकराव्या वर्षी पडला व त्याने त्याचे उत्तरही शोधून काढले! प्रसंग -३ एका रेडिओ चॅनेल वर मेड...

सोशलायजेशन पुन्हा एकदा...

" होमस्कुलिंग करता आहात का ? अरे व्वा छान छान. " " पण तुम्ही मुलाला ग्राउंड वगैरे लावा बरं का ? आणि खेळायला पाठवता ना खाली मुलांच्यात , तेवढे नक्की करत जा. " " हो का , पण कशासाठी. " " कसं आहे , होमस्कुलिंग चांगलं आहे हो , पण तो शाळेत जात नाही ना , मग त्याचे सोशलायजेशन होण्यासाठी तर हे केलेच पाहिजे , ना. " वारंवार हे ऐकल्यावर , मी या विषयावर माझ्या ब्लॉगवर अतिशय सविस्तर लिहिले आहेच , पण तरीही काही मुद्दे पुन्हा एकदा नव्याने समोर ठेवावे , म्हणून हा लेखनप्रपंच. होमस्कुलिंग व सोशलायजेशन याचा विचार करताना सगळ्यांच्या मनात एक लोकप्रिय गृहीतक असते, ते म्हणजे, शाळेत गेले की मुलांचे (आपोआप) सोशलायजेशन होते. आता एकीकडे हे गृहीतक आणि दुसरीकडे वस्तुस्थिती यांचा विचार करूया. वस्तुस्थिती १ - समाजात आज होमस्कुलिंग करणाऱ्या मुलांची संख्या नगण्य आहे. तरुण व मध्यमवयीन नागरिकांचा विचार केला तर त्यामध्ये होमस्कुलिंग करणारे शोधणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखे आहे. वस्तुस्थिती २ - आपल्या समाजाकडे आज बघितल्याव...