होमस्कुलिंग करायचे का? हा
विचार सोबत घेऊन येतो, एक मोठ्ठा प्रश्न..
परीक्षांचे काय?
परीक्षाच नसेल तर सर्टिफिकेट
कसे मिळणार? सर्टिफिकेट नसेल तर नोकरी कशी मिळणार?
खरे तर एकदा होमस्कुलिंगला
सुरुवात केली की एक दोन वर्षाच्या अनुभवाने या प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळतात. पण सुरुवात करताना मात्र मनात परीक्षा,
सर्टिफिकेट व प्रचलित व्यवस्थेशी जुळवून घेण्याचे मार्ग याविषयी साहजिकच शंका
असते. जर त्याविषयी अधिकृत माहिती मिळाली तर निर्णय घेणे सोपे जाते, हे नक्की.
आम्हाला होमस्कुलिंग
करण्याची मानसिक तयारी करत असलेल्या पालकांकडून जे प्रश्न वारंवार विचारले जातात,
त्या सगळ्या प्रश्नांची अधिकृत उत्तरे एन. आय. ओ. एस. (NIOS) या भारत सरकारच्या
मुक्त शिक्षण विषयी सर्वाधिकार असलेल्या संस्थेने विस्तृतपणे दिली आहेत.
जर कुणाला होमस्कुलिंग
करणाऱ्या मुलांचे प्रचलित व्यवस्थेत कसे होणार? हा प्रश्न छळत असेल, तर त्यांनी ही
उत्तरे शांतपणे जरूर वाचावीत.
तुमच्या मुलाची जर प्रचलित शिक्षणव्यवस्थेत
घुसमट होत असेल, तर सुदैवाने त्याला हव्या त्या गतीने, कलाने व मर्जीने शिक्षण
घेण्याची व माणूस म्हणून त्याला मिळालेल्या क्षमता ओळखण्याची व पूर्ण ताकदीने
वापरण्याची संधी उपलब्ध आहे, याची खात्री पटावी, या उद्देशाने ही सरकारी अधिकृत
माहिती माझ्या ब्लॉगच्या पुढील लिंकवर मी उपलब्ध करून दिली आहे..
Comments
Post a Comment