Skip to main content

Posts

Showing posts from February, 2019

मुक्त शिक्षण - माझा झी दिशा मध्ये प्रसिद्ध झालेला लेख

"माझा मुलगा शाळेत जायला तयारच होत नाही हो. तसा अभ्यासात चांगला आहे, परीक्षेत मार्क सुद्धा चांगले मिळवतो, पण शाळेत जायचा मात्र प्रचंड कंटाळा करतो, आम्ही काय करू?" आम्ही आमच्या मुलाचे म्हणजे स्नेह्चे, गेली चार वर्षे होमस्कुलिंग करत असताना, आम्हाला भेटायला येणारे बहुतेक पालक याच वाक्याने सुरुवात करतात! ते सांगतात यात नक्कीच तथ्य असते. याचे कारण काय असावे? हा विचार करता करताना मी पंधरा वीस वर्षे मागे गेलो. त्या काळी मुलांना बाहेरच्या जगाची माहिती करून देणारे एकमेव केंद्र होते ते म्हणजे शाळा. शाळेत वयानुसार इयत्ता ठरतात. इयत्तेनुसार कोणती व किती माहिती मुलांना द्यायची याचे प्रमाण ठरते. त्यामुळे पाचवीतल्या मुलाला "पाऊस कसा पडतो?" याची असलेली माहिती, दुसरीतल्या मुलाला असेलच असे नाही. मात्र तंत्रज्ञानातील बदलांचा अफाट वेग, स्मार्टफोन व इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना युट्युब सारखे उपलब्ध झालेले माध्यम त्यामुळे कोणत्याही वयाच्या मुलाला हवी ती "माहिती" सहज उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे शिकण्याला असलेली वयाची, वेळेची, पुस्तकाची मर्यादाच कोलमडून पडली. इ...

होमस्कुलिंग - मुक्त शिक्षण - माझा व प्रीतीचा लोकमत मधील लेख

"आमच्या मुलाचे होमस्कुलिंग करायचे आहे, त्यासाठी आम्ही काय करू ते सांगा." अशी विचारणा आम्हाला पालक करतात. गेली चार वर्षे आमच्या मुलाचे म्हणजे स्नेहचे होमस्कुलिंग करत असताना सुरुवातील नवलाई म्हणून भेटायला येणारे पालक आता खरोखरच या पर्यायाचा गंभीरपणे विचार करू लागल्याने भेटायला येतात, असे जाणवू लागले आहे. वेगवेगळ्या कारणाने सातत्याने छोटी होत जाणारी कुटुंबे, त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाविषयी जागरूक झालेले पालक, नोकरीच्या ठिकाणी रोज नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानामळे होणारे बदल व त्या तुलनेत मागे असलेली शिक्षणपद्धती, यामुळे अनेक पालक आज अस्वस्थ आहेत. दुसरीकडे स्मार्टफोन, स्मार्टटीव्ही, लॅपटॉप   या माध्यमातून मुलांना तंत्रज्ञानाची खूपच जवळून ओळख होऊ लागली आहे. त्यामुळे कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची त्यांची प्रक्रिया व पद्धत खूप वेगाने उत्क्रांत होत आहे. या प्रक्रियेत प्रचलित शिक्षण घेणे अनेक मुलांना अडचणीचे जात आहे..त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर होत नसल्याने त्यांची घुसमट होत आहे. सुदैवाने आज अनेक पालकांच्या लक्षात ही घुसमट येत आहे व त्यांच्या परीने ते शाळा ब...