Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019

होमस्कुलरचे मार्कलिस्ट - भाग 2

तुम्ही होमस्कुलिंग करत असाल आणि परीक्षाही देत नसाल, तर तुमचा मुलगा शिकतोय, याचा तुमच्याकडे कोणताच पुरावा नसतो. त्यामुळे मुलांना एक विशिष्ट कंटेंट म्हणजेच अभ्यासक्रम देऊन त्या कंटेंट मधले त्याने किती शोषून घेतले आहे, हे मार्कलिस्ट हा सोपा पुरावा वापरून सिद्ध करता न येणे, अनेकदा मुलाच्या शिकण्याविषयी तुमचा आत्मविश्वास डळमळीत करते. मागच्या पाच वर्षात, एकीकडे स्नेहचे स्व अध्ययन सुरू असताना, दुसरीकडे आमचेही, शिक्षण म्हणजे नक्की काय, मुले स्वतः हून शिकतात म्हणजे नक्की कशी शिकतात, याविषयी सातत्याने अभ्यास सुरू होता. त्या अभ्यासाच्या आधारे शिकणे म्हणजे माहिती गोळा करणे व परीक्षेत ती माहिती जशीच्या तशी उतरवून जास्तीत मार्क मिळवून बुद्धिमता सिद्ध करणे नव्हे, एवढे समजले होते. शिक्षण समजून घ्यायचे असेल, तर कंटेंट किंवा अभ्यासक्रम नाही तर शिकण्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे हेही मनाशी पक्के झाले होते. मात्र आम्ही जे शिकलो, ते अंमलात कसे आणायचे याबाबतीत मात्र आम्ही कमी पडत होतो. स्नेहने गेमच्या माध्यमातून असेल, इंटरनेटच्या माध्यमातून असेल, क्षेत्र भेटीतून असेल किंवा त्या त्या क्षेत्रा...

होमस्कुलरचे मार्कलिस्ट - भाग 1

नुकतंच आम्ही मंगलोरला गेलो असतानाचा हा किस्सा. मंगलोर हे भारतातील एक प्रसिद्ध बंदर आहे. किनाऱ्यावरच पोर्ट ट्रस्टचे एक मोठे आवार आहे. तिथे अनेक मोठमोठ्या मालवाहू जहाजांची ये जा सुरू असते. आम्ही त्या किनाऱ्यावर गेलो असताना, मी गोव्यातील मरमगोवा पोर्ट ट्रस्टमध्ये एका कामासाठी गेलो असताना, तिथे छोट्या बार्ज मधून आयर्न ओअर कशी आणतात, हे सांगितले. ते ऐकताना, त्याचा चेहरा कुतूहलाने फुललेला बघून, ही त्याला "शिकवण्याची" एक चांगली संधी आहे हे हेरले! मग मी त्याला आयर्न ओअर म्हणजे लोखंड बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल असतो, हे सांगून, माझ्याच सामान्य ज्ञानावर खूष होऊन, त्याला मी नवीन माहिती कशी दिली व त्याच्या ज्ञानात भर कशी घातली, या विचार करून, विजेत्याचे नजरेने बघू लागलो. अर्थातच माझ्या ज्ञानाचा साठा तिथेच संपल्याने, दोन मिनिटं शांतता पसरली.. पुढची सूत्र अचानकपणे स्नेहने हातात घेतली आणि आयर्न ओअर कन्व्हेअर वरून भट्टीत कशी नेतात, तिथे किती तापमान असते, मग त्याचे आयर्न गोट कसे बनवतात, ते गोट म्हणजेच, ट्रकवर आपल्याला दिसते ते रॉ लोखंड असते व त्यापासून वेगवेगळ्य...