मुलं सातत्याने दिसेल त्याच्याविषयी प्रश्न विचारत का सुटत असावीत? लहानपणापासून स्नेहच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं देताना हा प्रश्न मला कायम छळत आला आहे. त्याचे उत्तर मागच्या काही दिवसात मिळायला सुरुवात झाली आहे, असे मला वाटले म्हणून ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. या जगात आलेल्या प्रत्येक सजीवाला त्याच्या आजूबाजूच्या जगाविषयी प्रचंड कुतूहल असते. हे कुतूहल शमवण्यासाठी लहानपणापासून मुले दिसेल ती वस्तू हाताळून बघणे, चव घेण्याचा प्रयत्न करणे, तिच्यातून येणाऱ्या वेगवेगळ्या आवाजाचा अंदाज घेणे, ती वस्तू सर्व बाजूंनी डोळे भरून बघून घेणे, असं करत असतात. त्यातून ती वस्तू पुन्हा समोर आली तर प्रतिसाद कसा दिला पाहिजे, हे ठरवणे मुलांना सोपे जाते. अशा पध्दतीने आपल्या आजूबाजूचे जग समजून घेण्याचा प्रवास हा मूल जोपर्यंत बोलायला शिकत नाही, तोपर्यंत सुरू असतो. हा प्रवास तसं बघितलं तर इतर कोणत्याही प्राण्यांच्या पिल्लांसारखाच असतो. मात्र बोलायला शिकल्यानंतर एक मोठा फरक पडतो तो म्हणजे आजूबाजूचे जग समजून घेण्यासाठी ज्ञानेंद्रियांच्या जोडीने मूल भाषेचा वापर करायला शिकतं, प्...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.