Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

मुलांना कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंगचा क्लास लावण्याआधी हे जरूर वाचा

आजकाल मुले आठ दहा वर्षाची झाली रे झाली की दोन गोष्टी करण्याकडे त्यांचा कल दिसू लागतो. पहिली गोष्ट म्हणजे कोडिंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे युट्युब व्हिडियो. इवोलुशनरी सायकॉलॉजीच्या अंगाने विचार केला तर मुलांचा हा कल नैसर्गिक व साहजिक आहे. याचे कारण म्हणजे आजूबाजूला उत्तम उपजीविकेची खात्री देणाऱ्या मुलांना ज्या काही गोष्टी दिसतात त्यामध्ये आयटी आणि युट्यूब हे अव्वल स्थानावर आहेत आणि म्हणूनच मुले या क्षेत्रात आपले कौशल्य लवकरात लवकर सिद्ध करून या जगात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. युट्यूबमध्ये फारसे काही शिकवण्यासारखे नाही किंवा त्या शिकण्याला मनोरंजनाची किनार असल्याने पालक मुलांना युट्युब शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्याची शक्यता जवळपास नाही! मात्र कोडिंगचे तसे नाही!! आपले मूल जितक्या "लवकर" कोडिंग शिकायला सुरुवात करेल तितका तो "मोठा" म्हणजेच भरपूर पैसे मिळवणारा "प्रोग्रॅमर" होईल असा एक सर्वसाधारण समज आपल्याकडे आहे किंबहुना कोडिंगचे क्लासेस घेणाऱ्या मंडळींनी तो जाणूनबुजून पसरवला आहे, जोपासला आहे. याचा अर्थ मुलांनी लहान वयात कोडिंग शिकूच नये का? तर ज...

ऑनलाईन शिक्षण, मोबाईल आणि मुले - भाग २

  पालक म्हणून, शिक्षक म्हणून किंबहुना एक समाज म्हणून आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे, नॅचरल इन्स्टिकट चा विचार केला तर जोपर्यंत मुलांचे या इलेक्ट्रॉनिक साधनांशी पोटभर "खेळून" होत नाही, स्मार्टफोन, लॅपटॉप मधील बहुतेक फंक्शन आता आपल्याला समजली आहेत, ही साधने वापरण्याचे कौशल्य आपल्याला आत्मसात झाले आहे,  हा आत्मविश्वास जोपर्यंत मुलांना येणार नाही, तोपर्यंत मुले ही साधने आपल्याला अपेक्षित आहे, त्याप्रकारे शिकण्यासाठी, अभ्यासासाठी वापरणार नाहीत.   म्हणजेच हातात आलेले स्मार्टफोन, लॅपटॉप मुलांनी गेम खेळण्यासाठी वापरले असतील, युट्युब बघण्यासाठी वापरले असतील, मित्रांशी गप्पा मारण्यासाठी वापरले असतील, तर ते निसर्गनियमाला धरून आहे, हे समजून घ्यावे लागेल. ही अंत:प्रेरणा समजून न घेता, तुम्ही मुलांना, स्मार्टफोनला, ऑनलाईन शिक्षणाला दोष देत असाल तर तुम्ही मुलांवर व आधुनिक साधनांवर फार मोठा अन्याय तर करत आहातच पण मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर दूरगामी नकारात्मक परिणाम करत आहात आणि म्हणूनच  मुलांची शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया तुम्हाला समजून घेण्याची जास्...

ऑनलाईन शिक्षण, मोबाईल आणि मुले - भाग १ 

आजकाल ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने पालकांपुढे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यापैकी महत्वाचा प्रश्न म्हणजे मुलांकडून होणारा स्मार्टफोन व  लॅपटॉप   चा वापर. दोन ब्लॉगपोस्ट मधून मी या विषयावर झालेले संशोधन व माझे वैयक्तिक अनुभव व निरीक्षणे या माध्यमातून या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत आहे.  जरूर वाचा. उपयुक्त वाटले तर नक्की शेअर करा. आपलं मूल बोलायला जेव्हा सुरुवात करतं तेव्हा कसं बोबड बोलत असतं ना? ना शब्दांचा ताळमेळ, ना व्याकरणाचा गंध . पण म्हणून आपण त्याचं तोंड बांधतो का? की आपण त्याच्या त्या शब्दांशी खेळायच्या कृतीचे भरपूर कौतुक करतो? त्याला शब्दांशी खेळायला अजून प्रोत्साहन देतो?   की मूल अर्थपूर्ण वाक्य न बनवता, शब्दांशी खेळतंय म्हणून अस्वस्थ होतो? शब्द उच्चरायला सुरुवात करण्यापासून पूर्ण अर्थपूर्ण वाक्य बोलायला कमीत कमी दोन वर्षे तरी जातात. आपण तेवढ्या वेळ थांबतो अगदी तसंच मूल सुरुवातीला पुढं सरकायला लागतं, मग रांगायला, मग आधाराने उभं राहायला, आधाराने पुढं चालायला सुरुवात करतं. मग कसंतरी वाकडं तिकडं, कधी पळत तरी कधी पडत, पायांशी, हातांशी खेळत मग दोन ...