आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग ३ अनेकदा होमस्कुलिंग करण्याचा निर्णय आधी पालक घेतात आणि मग तो मुलांना सांगितला जातो . मात्र बेळगावच्या रावी कोडबागेच्या बाबतीत हे एकदम उलटे होते . शाळेत होणारी कुचंबणा , शारीरिक शिक्षा आणि जे आवडतंय ते शिकायला न मिळणे यामुळे कित्येक दिवसांपासून होमस्कुलिंग करायचा तिने तगादा लावला होता . रावीच्या आईने मग वर्षभर बेळगावमधील काही पालकांना सोबत घेऊन शिक्षणावरील वेगवेगळी पुस्तके वाचली . मुलांचे भातलावणीपासून ते वेगवेगळ्या ठिकाणांना एकत्र भेटी देण्याचे उपक्रम आयोजित केले . मुलांना शाळेपासून स्वातंत्र्य दिल्यानंतर मिळणारा मोकळा वेळ कसा वापरायचा ? हे समजतंय व त्यासाठी त्यांना आता आपण हवी ती मदत करू शकतो ही खात्री पटताच रावीला होमस्कुलिंग करायची परवानगी मिळाली . रावी सध्या तिच्यासारखे बेळगावमध्ये अजून मित्र मैत्रिणी मिळतात का याचा शोध घेत आहे ! स्नेहच्याच वयाचा मित चांदगुडे असाच शाळेला कंटाळला . शाळा त्याला समजून घेत नसल्याने व त्याला...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.