पहिली
दोन वर्षे क्रमिक पुस्तकांच्या मदतीने शिकत असताना मोकळ्या
वेळाचा उपयोग ज्या गोष्टी अजून
समजून घ्यायच्यात त्या पुस्तकाच्या बाहेर
जाऊन म्हणजे कधी थेट निसर्गात
जाऊन, कधी एखाद्या संस्थेत
जाऊन, कधी त्या क्षेत्रातील
तज्ज्ञ व्यक्तीला भेटून तर कधी इंटरनेटच्या
मदतीने समजून घ्यायला सुरुवात झाली. होमस्कुलिंगच्या तिसऱ्या वर्षांपासून स्नेहची आधी पुस्तकातून शिकणे
व मग ते पडताळण्यासाठी
बाहेर पडणे ही प्रक्रिया
बरोब्बर उलटी झाली. आता
स्नेह बाहेरच्या जगाशी जास्त जोडला गेला आणि त्या
जगातले प्रश्न सोडवण्यासाठी कधी पुस्तके तर
कधी ऑनलाईन साधने यांची मदत घेऊ लागला.
भूतकाळातील या सगळ्या गोष्टींची उजळणी करता करता, पाच वर्षांपूर्वी आम्ही स्वअध्ययनाच्या रूपाने स्नेहच्या मनात जे बीज पेरले होते, त्याचे आता रोपटे झाल्याने थ्रीडी डिझाईन शिकण्याची जबाबदारी घेऊन तो त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी शोधण्यासाठी कसा सक्षम आहे हे दाखवण्यासाठी त्याने आम्ही सुचवलेला क्लास नाकारून स्वतःहुन शिकण्याचा निर्णय घेतला हे आम्हाला उमगले आणि आम्ही योग्य मार्गावर आहोत याची खात्री पटल्याने सुटकेचा निश्वास टाकला. आज तो थ्रीडी डिझाईन शिकण्यासाठी जी धडपड करतोय तीच धडपड उद्या तो त्याच्या आवडीच्या गोष्टीत उच्च शिक्षण घेण्यासाठी व त्यासाठी मार्गात येणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी करेल असे आम्हाला वाटते.
अशीच गोष्ट दीड वर्षांपूर्वी होमस्कुलिंग सुरु केलेल्या असीम क्षोत्रीची आहे. होमस्कुलिंगला सुरुवात केल्यावर सुरुवातीचे चार पाच महिने त्याने काही न करता फक्त स्वतःला या नवीन पद्धतीशी जुळवून घ्यायला लावले. त्यादरम्यान तो त्यांचं आवडत सायकलिंग, प्रोग्रामिंग, छोटे मोठे बिजनेस करणे या गोष्टी जमेल तशा करत होताच. शिवाय तो लहानपणापासून प्रयोगशील शाळेत गेल्याने स्वतःहून शिकण्याची सवय त्याला होतीच. सहा महिन्यात त्याने या प्रक्रियेशी जुळवून तर घेतलेच शिवाय आता त्याला भरपूर मोकळा वेळ मिळाल्याने त्याच्या आवडीच्या गोष्टी तो अजून मुळापर्यंत जाऊन करू लागला आहे.
Comments
Post a Comment