आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग ५ मार्चपासून कोरोनामुळे जवळपास सगळ्याच मुलांना नाईलाजाने का होईना " होमस्कुलिंग " करावे लागत आहे . मार्चमध्ये ही गोष्ट लक्षात आल्यानंतर स्नेहने आमच्या सर्जनशील पालक या समूहातील काही शाळेत जाणाऱ्या पण " जबरदस्तीने " होमस्कुलिंग करणाऱ्या मुलांना एकत्र घेऊन ऑनलाईन प्रोग्रॅमिंग शिकायला सुरुवात केली . ही शिकण्याची प्रक्रिया पूर्णपणे मुलांच्या नियंत्रणात होती . कोणत्याही मोठ्या व्यक्तीची इंटरनेट उपलब्ध करून देण्यापलीकडे कोणतीच भूमिका नव्हती . या उपक्रमातून स्नेह , निधी , कैवल्य , अनिश , आयुष , ज्ञानेश , अर्जुन व साकेत या मुलांनी मागच्या चार महिन्यात स्वतःहून दोन प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकल्या एवढेच नाही तर मुले स्वतःहून कशी शिकतात याचे प्रात्यक्षिक त्यांनी अमेरिकेतील शिक्षणतज्ज्ञांना अर्थातच ऑनलाईन दिले ! सध्या काही मुलांच्या ऑनलाईन शाळा व क्लासेस सुरु झाल्याने वेळ मिळत नसल्याने ही मुले पहाटे पावणे सहाला भेटून प्रोग्रॅमिंग शिकतात . ' आमची...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.