आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग ५
मार्चपासून
कोरोनामुळे जवळपास सगळ्याच मुलांना नाईलाजाने का होईना "होमस्कुलिंग"
करावे लागत आहे. मार्चमध्ये
ही गोष्ट लक्षात आल्यानंतर स्नेहने आमच्या सर्जनशील पालक या समूहातील
काही शाळेत जाणाऱ्या पण "जबरदस्तीने" होमस्कुलिंग करणाऱ्या मुलांना एकत्र घेऊन ऑनलाईन प्रोग्रॅमिंग
शिकायला सुरुवात केली. ही शिकण्याची प्रक्रिया
पूर्णपणे मुलांच्या नियंत्रणात होती. कोणत्याही मोठ्या व्यक्तीची इंटरनेट उपलब्ध करून देण्यापलीकडे कोणतीच
भूमिका नव्हती.
या उपक्रमातून स्नेह, निधी, कैवल्य,अनिश,आयुष, ज्ञानेश, अर्जुन व साकेत या मुलांनी मागच्या चार महिन्यात स्वतःहून दोन प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकल्या एवढेच नाही तर मुले स्वतःहून कशी शिकतात याचे प्रात्यक्षिक त्यांनी अमेरिकेतील शिक्षणतज्ज्ञांना अर्थातच ऑनलाईन दिले! सध्या काही मुलांच्या ऑनलाईन शाळा व क्लासेस सुरु झाल्याने वेळ मिळत नसल्याने ही मुले पहाटे पावणे सहाला भेटून प्रोग्रॅमिंग शिकतात. 'आमची मुले स्वतःहून एवढ्या सकाळी उठू शिकतात यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही' ही पालकांनी दिलेली प्रतिक्रियाच "मुलांना स्वतःहून शिकण्याचा निर्णय घ्यायची परवानगी दिली" तर काय घडू शकते याची प्रचिती देते!
ऑनलाईन किंवा शाळेबाहेरचे शिक्षण यशस्वी करायचे असेल तर शिकण्याच्या प्रक्रियेचे नियंत्रण हे विद्यार्थ्याकडे देणे आवश्यक आहे किंबहुना त्याविषयी ही प्रक्रिया सुरुच होऊ शकत नाही, असे हार्वड विद्यापीठाच्या शिक्षण विभागाचे संशोधन सांगते. त्यामुळे आता जो ऑनलाईन - ऑफलाईन शिक्षणाचा गोंधळ सुरु आहे, तो थांबवायला काही दिवस अभ्यासक्रम बाजूला ठेवून शिकण्याचे नियंत्रण मुलांकडे देत त्यांना जे शिकायचं आहे ते शिकू दिलं पाहिजे. त्यामुळं मुले पुस्तकातील धडे शिकली नाहीत तर शिकण्याची "प्रक्रिया" मात्र नक्की शिकतील व त्या आधारावर धड्यांचे आकलन योग्यवेळी सहज करून घेतील हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो!
चेतन
व प्रीती एरंडे.
chetanerande@gmail.com
Comments
Post a Comment