होमस्कुलिंगच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी, "होमस्कुलिंग करण्याचे नक्की कारण" आपल्याला माहिती असले पाहिजे, हे आपण मागील भागात बघितले. हे कारण शोधत असताना, आमच्या अनुभवावरून मी असे सांगू शकतो की होमस्कुलिंगचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा विनियोग करण्याची अत्यंत महत्वाची ताकद आपल्याला मिळते. त्याचबरोबर वेळेचे नियोजन मुलांच्या कलाने करून, त्यांची ऊर्जा, शिक्षणाची साधने व पद्धत ठरवण्याचे महत्वपूर्ण स्वातंत्र्य आपल्याला मिळते. यामुळे मुलांचे केवळ पुस्तकी शिक्षण न होता एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मुलांना सर्वांगीण शिक्षण मिळवण्याची संधी आपण देऊ शकतो. आता आपल्याला होमस्कुलिंग का करायचे याचे उत्तर शोधता आले की आपल्याला जो पुढचा प्रश्न घ्यायचा आहे तो म्हणजे आपले स्टेकहोल्डर्स कोण आहेत, म्हणजेच या निर्णयाचा परिणाम कुणावर होऊ शकतो आणि या निर्णयावर परिणाम कोण करू शकतात यांची यादी तयार करणे. या यादीत आपण स्वतः, मूल, आपले नातेवाईक, कदाचित शेजारी, मूल शाळेत जात असेल तर त्याची सध्याची शाळा, स्कुल व्हॅन चालक, मुलाचे मित्र, मुलगा होमस्कुलिंग करू लागल्यावर, ओपन स...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.