होमस्कुलिंग व सोशलायजेशन - भाग १ होमस्कुलिंग व सोशलायजेशन याविषयी अनेक पालक सतत आम्हाला प्रश्न विचारात असतात. म्हणून मी दोन भागात या विषयावर लिहित आहे. पुण्यापासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर साने गुरुजी स्मारक येथे एक पाच दिवसांचे निवासी शिबीर दरवर्षी होते . महाराष्ट्रातील वे ग वेगळ्या भागातून सुमारे पन्नास मुलांना तिथे पाच दिवस आई वडिलांपासून लांब स्वावलंबी जीवन जगण्याची व वेगवेगळ्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते . अशा ठिकाणी , म्हणजेच साने गुरुजी स्मारकाच्या अभिव्यक्ती शिबिरामध्ये, जिथे त्याच्या व आमच्या ओळखीचे कुणीही नाही तिथे आमच्या अकरा वर्षाच्या मुलाला म्हणजे स्नेहला पाठवायचा निर्णय यंदा आम्ही घेतला . त्यात काय विशेष , असे तर आम्हीही करतोच की , असे तुम्ही म्हणणे स्वाभाविक आहे. बरोबर , बरेच पालक असे करतात , पण या घटनेतील वैशिष्ठ्य हे आहे , की आमचा स्नेह मागची तीन वर्ष शाळेतच गेलेला नाही , तो स्वअध्ययन म्हणजेच होमस्कुलिंग करतो . तो होमस्कुलिंग ...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.