दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन, हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡
मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️♂️🌍
या जीवनशैलीमध्ये—
🍀 आपला आहार
👕 आपली वेशभूषा
💼 आपली उपजीविका
👶 आपल्या मुलांचे संगोपन
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया—केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता, निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖
आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला—
😊 सुखाचा
🙏 समाधानाचा
🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨
ही सगळी जीवनातील पायऱ्या आहेत. 🏡 वयाच्या, वैविध्यपूर्ण अनुभव घेण्याच्या तयारीच्या, समर्पणाच्या आणि ज्ञानाच्या ओढीतून आपण एक-एक पायरी चढू लागतो. 📈💡
📌 तरीही पहिली पायरी यशस्वीपणे पार करण्यासाठी, सुरुवातीला रेफरन्स मदतीला असल्यास आत्मविश्वास वाढू शकतो. त्यामुळे संगोपन आणि शिक्षणाच्या नैसर्गिक प्रक्रियेतून काय होऊ शकते, हे मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. ✍️📚
स्नेहच्या संगोपनाचा प्रयोग 🔬👨👦
स्नेहच्या संगोपनाच्या बाबतीत आम्ही काटेकोरपणे निसर्गाचे डिझाईन फॉलो करण्याचा प्रयत्न केला. 🌱 सध्याच्या काळात एवढी प्रचंड स्पर्धा असताना असे "प्रयोग" केले तर पुढे जाऊन काय होणार? 🤔
विशेषतः तो समाजामध्ये मोठा झाल्यावर कसा वावरू शकेल? 🤷♂️
ही भीती अनेकांना होती, आम्हालाही होती.
मात्र त्याचा "एक्स्प्लोरेशन" टप्पा संपून, त्याने प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर—
✈️ युरोपचा एकट्याने केलेला प्रवास
🎤 अनेक ठिकाणी दिलेली प्रेझेंटेशन
🤖 नवीन तंत्रज्ञानावर केलेले काम
🏆 आणि परवाच दिल्लीतील एजिस ग्रॅहम बेल अवॉर्ड कार्यक्रमात केलेले प्रेझेंटेशन
या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली—
जर आपण निसर्गाचे डिझाईन तंतोतंत फॉलो केले तर काय होऊ शकते?
याचा मला सातत्याने अंदाज येऊ लागला आहे. ✅🌍
पालकांसाठी एक महत्त्वाचा विचार 🧠💭
खरे तर मुलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देणे,
त्या क्षमता तपासून पाहण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करून देणे—
एवढीच निसर्गाने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आहे. 🙌🌱
🌍 निसर्गाने लाखो वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर
या प्रक्रिया आणि डिझाईन्स तयार केल्या आहेत.
आणि आपण फक्त ३०-४० वर्षांच्या तोकड्या अनुभवाच्या आधारे
या डिझाईनमध्ये "ओव्हरपॉवर" करत मुलांच्या जीवनात हस्तक्षेप करू लागलो—
तर ते त्यांच्या भविष्यासाठी तोट्याचे ठरू शकते. ⚠️🚫
तातडीने बदल करण्याची गरज 🔄
👶 मुलांचे संगोपन
📖 शिकण्याची प्रक्रिया
💖 भावनिक वाढ
🏀 खेळ आणि शारीरिक वाढ
या सगळ्यात तातडीने निसर्गपूरक बदल करण्याची गरज आहे, असे मला वाटते. 🌏✅
आपण एकत्र येऊ शकतो! 🤝
हे बदल आपण कसे घडवून आणू शकतो यावर जर कुणाला खरोखर काम करायचे असेल,
तर मला एकत्र काम करायला आवडेल. 🤗✨
🔹 संपर्कासाठी:
📧 chetanerande@gmail.com
✍️ चेतन एरंडे 🚀
Comments
Post a Comment