पुढील लेख झी दिशा मध्ये नुकताच प्रसिध्द झाला होता. आमच्या सर्जनशील पालकत्वाच्या प्रवासाला सुरुवात नक्की झाली तरी कशी, हे मी या लेखातून मांडायचा प्रयत्न केला आहे. आधी सांगितल्याप्रमाणे होमस्कूलिंग व सर्जनशील पालकत्व या दोन्हीविषयी आम्ही लिहिणार आहोत, याचा हेतू, दोन्ही प्रवासाच्या वाटा जवळपास सारख्याच आहेत व एकमेकींशी गुंफल्या गेल्या आहेत, हे वाचकांच्या लक्षात यावे हा आहे. सर्जनशील पालक होताना.. स्नेह, म्हणजे माझा मुलगा दोन किंवा तीन वर्षांचा होता, तेव्हा मी माझ्या नोकरीतील कामाच्या निमित्ताने सतत बाहेरगावी असायचो. त्यामुळे त्याची सगळी जबाबदारी प्रीतीने, म्हणजे त्याच्या आईनेच घेतलेली होती. (आत्ता सुद्धा बऱ्यापैकी तिच्याकडेच आहे!) . सतत आईबरोबर असल्याने ती त्याची जवळची मैत्रीण होती. तर मी म्हणजे कधीतरी घरी येणारा आणि थोडे दिवस आपले लाड करून, म्हणजे नवीन वस्तू किंवा खाऊ देऊन, लगेचच परत निघून जाणारा माणूस अशी त्याची समजूत झाली होती. त्याच्या मनातील काही सांगायचे असेल तर तो पटकन आईकडे जायचा आणि त्याला कुठली नवीन वस्तु किंवा खाऊ आणायचा असेल तरच माझ्याकडे यायचा....
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.