माणसाला जगायला काही गोष्टींची नितांत आवश्यकता असते. जसं कि श्वास घेणे, भावना व्यक्त करणे, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना प्रतिसाद देणे, धोका ओळखणे, प्रगतीच्या संधी शोधणारे व त्यावर कृती करणे वगैरे. हि यादी अजून वाढवायची झाली तर चालणे, बोलणे, कोणता पदार्थ खावा व कोणता खाऊ नये, अशा काही गोष्टी जोडता येतील, या सगळ्या गोष्टींमध्ये मला एक सामान धागा दिसतो तो म्हणजे या सगळ्या गोष्टी जगभरातील सगळी माणसे जवळपास एकाच प्रकारे करतात आणि या सगळ्या गोष्टी प्रत्येक माणूस कोणत्याही "लौकिक" शिक्षणाशिवाय करू शकतो. हे तो कसे करू शकतो? याचा अनेक संशोधकांनी त्यांच्या परीने विचार केला त्यावर अत्यंत शास्त्रशुद्ध संशोधन केले व जवळपास सगळ्यांनीच माणूस "नैसर्गिक प्रेरणेने" आणि "स्वतःहून" शिकण्यासाठी सक्षम आहे, हे मान्य केले. मग त्यातूनच "बक्षिसे व शिक्षा" हि शिकवण्याची पद्धत मागे पडून "ज्ञानरचनावाद" पुढे आला. पियाजे पासून ते केन रॉबिन्सन, पीटर ग्रे, ए, एस निल, डॉ. यशपाल, अनिल सदगोपालन अशा जगभरातील शिक्षणतज्ज्ञांनी मुलांच्या शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर भर ...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.