चिडचिड,
वैताग आणि आकांडतांडव या
तिन्ही गोष्टींशी आपला कधी ना
कधी संबंध येतोच. कधी आपण चिडतो,
वैतागतो म्हणून तर कधी पुढचा
चिडलेला, वैतागलेला असतो म्हणून...
मी स्वतःया भावनांचा वारंवार आणि स्वैरपणे वापर
करतोच शिवाय या भावना वारंवार
वपरणाऱ्या अनेक लोकांशी माझा
सातत्याने संबंध येतो. मी जरी चिडत,
वैतागत असलो तरी मला
ओढ आहे ती समाधानाची,
आनंदाची आणि शांततेची!
त्यामुळे
गेले काही दिवस आनंदी
कसे रहावे किंवा सायन्स ऑफ हॅप्पीनेस या
गोष्टीचा मी अभ्यास करत
होतो. माझ्यामध्ये काय बदल करावे
लागतील याचा शोध घेत
होतो. सायन्स ऑफ हॅप्पीनेस असं
इंटरनेटवर, पुस्तकात, रिसर्च पेपरमध्ये शोधात असताना, मला ते चक्क
घरातच सापडले आणि काखेत कळसा
आणि गावाला वळसा अशी माझी
अवस्था झाली!!
असं
नक्की काय झालं कि
हे सायन्स मला घरातच समजलं?
साधारण दोन
आठवड्यापूर्वीची गोष्ट. अजून लॉकडाऊनला सुरुवात व्हायची होती. मात्र हळूहळू एकेक गोष्ट
मिळायची बंद व्हायला किंवा त्या वस्तूचा तुटवडा व्हायला सुरुवात झाली होती. शिवाय आता
पुढचे काही दिवस तरी घरातच बसावे लागणार याचा देखील अंदाज येऊ लागला होता.
त्यातच घरात
इतके दिवस मधीमधी येणारे पत्ते नेमके गरज होती तेव्हा गायब झाले होते. शोधून शोधून
वैताग आल्याने शेवटी घाईघाईने ऍमेझॉन वरून उनो (पत्त्यासारखी एक कार्ड गेम) मागवले.
आता दोन दिवसात ते येणार तेवढ्यात लॉकडाऊन जाहीर झाले आणि तिकडे उनो आणि इकडे आम्ही
आहे त्या जागेवर स्टॅच्यू झालो!!
आता कायचे काय?
कार्ड गेम तर हवी होतीच. ती मिळत नसल्याने आता चिडचिड, वैताग होणार हे मी गृहीत धरले
असतानाच मला एक वेगळे दृश्य दिसले. ते म्हणजे स्नेहने घरात पडून असलेल्या स्टिकी नोट्सचे
उनो कार्ड्समध्ये रूपांतर केले आणि कार्ड गेम खेळायला सुरुवात झाली!!
असाच दुसरा
प्रसंग. माणूस श्वास न घेता किती दिवस जगेल, पाणी न पिता किती दिवस जगेल हे जस ठरलेलं
आहे, तसंच स्नेह आणि मी बटाटा वडा न खाता जास्तीत जास्त दिवस किती दिवस "शांतपणे"
जगू शकतो, हे देखील ठरलेल आहे!! लॉकडाऊन मुळे वडा पाव मिळायचा बंद झाल्याने तगमग वाढू
लागली आणि आता चिडचिड होणार हे स्पषट दिसू लागले.
मी हातावर हात
धरून आतल्याआत वैतागत व चिडत असताना स्नेहने मात्र पुन्हा एकदा मला अचंबित केले. त्याने
सरळ युट्युबवर रेसिपी बघण्यापासून, डाळीचे पीठ, बटाटे, लसूण, मिरची असे सगळे जिन्नस
जमा केले आणि जवळजवळ स्वतः:हुन बटाटावडा घरीच बनवला!!
आता तुम्ही
म्हणाल यात कसलं आलय सायन्स ऑफ हॅप्पीनेस? हि तर स्वतः;च्या पोराचं कौतुक करण्याची
एक युक्ती दिसतेय!
आहे पण यात
सायन्स ऑफ हॅप्पीनेस आहे! ते कुठं आहे, हे समजून घेउया पुढच्या भागात.
क्रमश:
चेतन
एरंडे
Comments
Post a Comment