सायन्स
ऑफ हॅप्पीनेस याचा सरळ सरळ
अर्थ म्हणजे
वैताग, चिडचिड यावर मात करून
समाधानी कसं राहायचं हे
शिकणे. अर्थात समाधानी राहणे म्हणजे दरवेळी प्राप्त परिस्थिती स्वीकारून "आलीया भोगासी" असा विचार करून
"समाधान मानणे" नव्हे. तर ज्या गोष्टीमुळे
मला समाधान मिळणार आहे, ती गोष्ट
मिळवण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या साधनांचा वापर करायला शिकणे
हे आहे.
सायन्स
पफ हॅप्पीनेसचा पायासुद्धा हाच आहे. समाधान
मानू नका, ते मिळवण्यासाठी
स्वतःला "तयार" करा.
मला
स्नेहकडे बघताना एक गोष्ट प्रकर्षाने
जाणवते ते म्हणजे परिस्थिती
कितीही बिकट असेल तरी
शांत,आनंदी राहून चिडचिड, वैताग न करता, सगळी
ऊर्जा तो त्या परिस्थितीतून
मार्ग काढण्यासाठी वापरतो. मी मात्र स्वतःवर
नाहीतर कुणालातरी बकरा बनवून चिडचिड
करण्यात, इतरांना दोष देण्यात, ते
कसे चिकीचे आहेत व त्यांच्या
चुकीमुळे मला त्रास कसा
होतो, समाधानी कसे राहता येत
नाही, याचा पाढा वाचण्यातच
सगळी ऊर्जा घालवतो!
त्यामुळे
समस्या सोडवण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी
जेव्हा ऊर्जेची खरी गरज असते
तेव्हा माझ्याकडची ऊर्जा संपलेली असते आणि त्यामुळे
माझी चिडचिड अजूनच वाढते!!
हे सायन्स ऑफ हॅप्पीनेस त्याला
नक्की कसे जमते, हे
मी काल त्याने जरा
आडवळणाने विचारायचा प्रयत्न केला तेव्हा तो
मला म्हणाला,"बाबा ड्रीम बिग
अँड फिगर इट आऊट"
एवढ्या दोन गोष्टींवर लक्ष
दिले कि आपण हवे
ते करू शकतो!
बापाची
चप्पल पोराच्या पायात "फिट्ट" बसायला लागली आहे हे आज
पुन्हा एकदा जाणवले. जोपर्यंत
" ड्रीम बिग अँड फिगर
इट आऊट" एवढा मंत्र तो
जपून ठेवेल तोपर्यंत आम्हाला चिंता करायची गरज नाही.
आज
"ड्रीम बिग अँड फिगर
इट आऊट" साठी कीबोर्डची पॉवर,
उनो कार्ड्स आणि बटाटा वडा
आहेत, उद्या आयुष्यातील अजून गुंतागुंतीची आव्हाने
त्याच्यापुढे उभी राहतील तेव्हा
सुद्धा तो याच मंत्राच्या
जोरावर तरून जाईल, अशी
आत्ता खात्री वाटू लागली आणि
मी माझ्या पुढच्या समस्या "फिगर इट आऊट"
करून सायन्स ऑफ हॅप्पीनेसचा पहिला
धडा पूर्ण केला!!
समाप्त
चेतन
एरंडे
08/05/2020
Comments
Post a Comment