माणसाला जगायला काही गोष्टींची नितांत आवश्यकता असते. जसं कि श्वास घेणे, भावना व्यक्त करणे, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना प्रतिसाद देणे, धोका ओळखणे, प्रगतीच्या संधी शोधणारे व त्यावर कृती करणे वगैरे. हि यादी अजून वाढवायची झाली तर चालणे, बोलणे, कोणता पदार्थ खावा व कोणता खाऊ नये, अशा काही गोष्टी जोडता येतील,
या सगळ्या गोष्टींमध्ये मला एक सामान धागा दिसतो तो म्हणजे या सगळ्या गोष्टी जगभरातील सगळी माणसे जवळपास एकाच प्रकारे करतात आणि या सगळ्या गोष्टी प्रत्येक माणूस कोणत्याही "लौकिक" शिक्षणाशिवाय करू शकतो.
हे तो कसे करू शकतो? याचा अनेक संशोधकांनी त्यांच्या परीने विचार केला त्यावर अत्यंत शास्त्रशुद्ध संशोधन केले व जवळपास सगळ्यांनीच माणूस "नैसर्गिक प्रेरणेने" आणि "स्वतःहून" शिकण्यासाठी सक्षम आहे, हे मान्य केले. मग त्यातूनच "बक्षिसे व शिक्षा" हि शिकवण्याची पद्धत मागे पडून "ज्ञानरचनावाद" पुढे आला. पियाजे पासून ते केन रॉबिन्सन, पीटर ग्रे, ए, एस निल, डॉ. यशपाल, अनिल सदगोपालन अशा जगभरातील शिक्षणतज्ज्ञांनी मुलांच्या शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर भर का दिला पाहिजे हे अत्यंत विस्तृतपणे मांडले आहे.
अनेकांना हे सगळं खुपच आदर्शवादी आणि पुस्तकी वाटण्याची शक्यता आहे आणि ते साहजिक आहे कारण हे सगळं प्रत्यक्षात आणायचं कसं? त्याची वास्तवातील काही उदाहरणे आहेत का? याविषयी फारच कमी माहिती आहे.
मी माझ्या युट्युब सीरिजच्या माध्यमातून आदर्शवाद प्रत्यक्षात आणायचा कसा? ततो आणल्याचे काय फायदे होऊ शकतात? हे मांडायचा प्रयत्न करत आहे, ती व्हिडियो सिरीज तुम्ही जर बघा.तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की सांगा.
पुढच्या भागात मी मुलांना निसर्गात: शिकण्यासाठी पालक काय करू शकतात?हे मांडायचा प्रयत्न करेन.
चेतन एरंडे.
Dhanyawad sir amhi pudhchya bhagachi wat pahat ahot
ReplyDelete