इतर विषय विशेष करून भाषा, परिसर विज्ञान शिकताना त्याला पुस्तकातील धडे वाचणे, व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे कंटाळवाणे वाटत होते. हे असे का होत असावे, याचा विचार करताना सहजच आमचे लक्ष तो वापरत असलेल्या NCERT च्या पुस्तकात शिक्षकांसाठी दिलेल्या सूचनांकडे गेले. त्या सूचना वाचताना व या क्षेत्रातील काही तज्ञ व्यक्तींशी चर्चा करताना, आम्हाला एक गोष्ट समजली, ती म्हणजे, अभ्यासक्रमाची पुस्तके ही खरी म्हणजे मुलांसाठी नसून, कोणत्या क्षमता विकसित होण्यासाठी काय तयारी करून घेतली पाहिजे, याची शिक्षकांसाठी असलेली माहिती पुस्तिका आहे. पुस्तकात जे लिहिले आहे, ते "साक्ष" म्हणून न वापरता, त्या माहितेचे "साक्षांकन" करण्यासाठी , ती माहिती तपासून घेण्यासाठी, मुलांना भरपूर मोकळा वेळ व वातावरण निर्माण करून देणे, हे शिक्षकाचे खरे काम आहे. हे समजल्यामुळे आम्ही तो वापरत असलेल्या पाठ्यपुस्तकात सांगितलेल्या संकल्पना सिद्ध करण्याची स्नेहला भरपूर संधी उपलब्ध करून देऊ लागलो, त्यामुळे त्याच्या क्षमता तर विकसित झाल्याच शिवाय, ज्ञान व माहिती याच्यातला फरक त्याला आपो...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.