Skip to main content

मुलांशी काय बोलायचं? भाग २


मागच्या भागात आपण मुलांशी संवाद सुरु करायला मदत करतील अशा पाच गोष्टींची माहिती करून घेतली होती. 

आज या दुसऱ्या व शेवटच्या भागात आपण पुढच्या पाच गोष्टींची माहिती करून घेऊ. 

६. असे कोणते प्रसंग आहेत, ज्यामध्ये तू "आऊट ऑफ कंट्रोल" होतोस असं तुला वाटतं? 
हे असं आऊट ऑफ कंट्रोल होणं हे अनेकदा मुलांनाही आवडत नाही. पण असे जर प्रसंग जर आपल्याला कळाले तर आपण अशा वेळी भावना नियंत्रित कशा कराव्यात, यासाठी त्यांची मदत करू शकू. 

७. तुझ्यामध्ये कोणती "बेस्ट क्वालिटी" आहे असं तूला वाटतं? 
आपण असं मानतो की प्रत्येक मूल हे "युनिक" आहे. हा युनिकनेस शारीरिक ठेवणीमुळे जसा येतो तसा व्यक्तिमत्वातल्या पैलूंनी सुद्धा येतो! मुलांशी संवाद करता करता मुलांना  स्वतःच्या अंगभूत क्षमतांविषयी आणि कौशल्यांविषयी काय वाटते हे समजून घेऊन, ती कौशल्ये व क्षमता स्वतःच्या आणि जगाच्या चांगल्यासाठी कशा वापरता येतील, याविषयी आपण त्यांना मदत करू शकतो. 

८ एखादी गोष्ट तुला सोडून द्यावीशी वाटते, तेव्हा तू तुझ्या मनाला काय सांगतोस? 
मुलांची धरसोड वृत्ती हा अनेक पालकांच्या चिंतेचा विषय असतो. अशा वेळी ही धरसोड का होते? त्यावेळी मुलांच्या मनात काय चालू असते? हे आपल्याला समजले तर एखाद्या गोष्टीत यश मिळवण्यासाठी लागणारे सातत्य आणि एखादी न आवडणारी गोष्ट न करण्याचे स्वातंत्र्य या दोन्हीचा "मिलाफ" करण्यासाठी मुलांना मदत करणे आपल्याला जमू शकेल!   

९. एखादी मोठी गोष्ट जसं की वार्षिक परीक्षेची तयारी किंवा स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती बनवणे, किल्ला बनवणे या गोष्टी करायच्या आधी तू काय तयारी करतोस? 
या मोठ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या छोट्या पायऱ्यांचा तू कसा विचार करतोस? नियोजन ही वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. या संवादातून मुलांना नियोजनाची सवय लावण्यासाठी आपल्यला मदत करता आली तर त्याच्या आयुष्यभर मुलांना कसा उपयोग होऊ शकेल? हे वेगळे सांगायला नको!! 

१०. शेवटचा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे तुला माझ्याकडून काय हवंय? 
हा प्रश्न खूप काळजीपूर्वक विचारला पाहिजे कारण तू माझी आई असून किंवा बाबा असून सुद्धा तुला मला काय हवंय, हे कळत नाही का? असा बिनतोड प्रश्न मुलं विचारू शकतात! त्यामुळे मुलाला अत्यंत विश्वासात घेऊन हा प्रश्न विचारणे आणि या संवादाच्या मदतीने मुलांना मी कोणत्याही प्रसंगात तुझ्या सोबत आहे, हा विश्वास देणे महत्वाचे आहे. 

या दहा प्रश्नांचा पालक म्हणून आपल्याला कायमस्वरूपी मदत होईल, असे मला वाटते.

हे दोन्ही लेख माझ्या ब्लॉगवर पोस्ट केले आहे, त्यांची लिंक खाली कॉमेन्टमध्ये दिली आहे.  
चेतन एरंडे. 



Comments

Popular posts from this blog

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

बदलत्या काळात शिक्षण कसे समजून घ्यावे?

  अनेकदा शिक्षण याविषयावर चर्चेला सुरुवात झाली की ती पूर्वी शाळा या विषयावर येऊन थांबायची. मागच्या काही वर्षात, विशेषतः कोविडनंतर, शिक्षण या विषयावर चर्चा करताना आता "शाळा की होमस्कूलिंग" अशी नव्या पद्धतीने चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे दोन ध्रुव तयार होऊन दोन्ही ध्रुव आपापली पोझिशन बळकट करण्यासाठी आपापले मुद्दे मांडू लागले. यामध्ये "शिकण्याची भाषा" हा एक नव्याने ध्रुव तयार होत आहे, असे देखील वाटू लागले आहे. कोणत्याही चर्चेत माझा एक कटाक्ष असतो — ज्या व्यवस्थेचा आपल्याला अनुभव नाही, त्यावर शक्यतो आपले मत व्यक्त करू नये; किंवा केल्यास त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ द्यावा. माझा गेल्या काही वर्षात शाळा या व्यवस्थेशी संबंध राहिलेला नाही, मात्र शिक्षणाशी आहे. त्यामुळे मी "शिक्षण" हा संदर्भ घेऊन माझे मत मांडायचा प्रयत्न करेन. १. मुलांच्या शिक्षणाविषयी विचार करताना सगळ्यात आधी आपल्या मुलांविषयी आपल्याला सहवेदना असणे गरजेचे आहे. २. या सहवेदनेने आपल्याला मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील अडथळे समजून घेणे आणि त्यांना नक्की कुठे मदत हवी आहे, ह...