होमस्कूलिंगच्या प्रवासाची तयारी
मागच्या काही दिवसांपूर्वी, लोकसत्ता मध्ये आलेल्या माझ्या होमस्कूलिंग
वरील लेखावर अनेक लोकांनी मेल करून प्रतिक्रिया दिल्या. काही जणांनी फोन वरून
संपर्क करून प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देत असताना बऱ्याच जणांनी एक प्रश्न
विचारला, तो म्हणजे, "आम्हाला होमस्कूलिंग करायचे आहे, पण त्याची सुरुवात कशी
करायची?
मला वाटते होमस्कूलिंगला सुरुवात करण्यापूर्वी पालकांनी पुढील प्रश्न
स्वत:ला विचारावेत, त्या प्रश्नांची उत्तरे शोधणे
हीच होमस्कूलिंगची पहिली पायरी आहे, सुरुवात आहे...
१. मला माझा मुलगा/मुलगी आवडतो/आवडते का?
२. माझा माझ्या मुलावर/मुलीवर पूर्ण विश्वास आहे
का?
३. माझ्या मुलाचा/मुलीचा आनंद कशात आहे, हे मला
समजले आहे का? जसे वय वाढेल, तसा "आनंद कशात आहे"
या प्रश्नांचे मुलाकडून येणारे उत्तर बदलत जाईल व ते मला मान्य असेल का?
४. मुलांनी/मुलींनी निवडलेला पर्याय मी
त्यांच्यासाठी निवडलेल्या पर्यायापेक्षा वेगळा असेल, तर मी मुलाच्या/मुलीच्या पर्यायाचा सन्मान करू शकेन
का?
५. "सोशलायझेशन" म्हणजे केवळ समाजात मिसळणे नसून, समाजात आत्मविश्वासाने वावरणे आहे,
आपल्या आजूबाजूचा समाज समजून घेणे आहे, व
आपल्या पुढे जाण्याच्या ईर्षेने इतरांचे नुकसान तर होत नाही ना, याची काळजी घेण्याचे "समाजभान"
असणे हे आहे, व ते मुलगा/मुलगी शाळेबाहेरराहूनही, समाजात मिसळून मिळवू शकतात,याची मला खात्री आहे का?
६. माझ्या मुलाचा/मुलीचा माझ्यावर पूर्ण विश्वास
आहे का?
७. शिक्षण म्हणजे काय, हे मला समजले आहे?
८. मूल कसे शिकते, हे मला समजले आहे?
९. मूल स्पर्धा नसताना किंवा परीक्षांच्या
स्वरुपात मूल्यमापन होत नसतानाही किंवा पुस्तक व अभ्यासक्रमाच्या मर्यादेत न राहता, शिकू शकेल, याची मला
खात्री आहे का?
१०. वेगळ्या
वाटेची निवड करताना, प्रचलित रूढी म्हणजेच सर्टिफिकेट, मार्क लिस्ट जर मला हवे
असेल, तर ते मला कसे मिळेल? त्याची
खात्री मी कशी करून घेतली पाहिजे?
या प्रश्नांची स्वत:ला पटतील, समजतील अशी उत्तरे
मिळवणे, ही होमस्कुलिंगच्या प्रवासाची पहिली व अत्यावश्यक पायरी आहे.
या प्रश्नांची मला व प्रीतीला समजलेली उत्तरे, मी
लवकरच पोस्ट करेन
©चेतन एरंडे.
Comments
Post a Comment