आजकाल मुले आठ दहा वर्षाची झाली रे झाली की दोन गोष्टी करण्याकडे त्यांचा कल दिसू लागतो. पहिली गोष्ट म्हणजे कोडिंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे युट्युब व्हिडियो.
इवोलुशनरी सायकॉलॉजीच्या अंगाने विचार केला तर मुलांचा हा कल नैसर्गिक व साहजिक आहे. याचे कारण म्हणजे आजूबाजूला उत्तम उपजीविकेची खात्री देणाऱ्या मुलांना ज्या काही गोष्टी दिसतात त्यामध्ये आयटी आणि युट्यूब हे अव्वल स्थानावर आहेत आणि म्हणूनच मुले या क्षेत्रात आपले कौशल्य लवकरात लवकर सिद्ध करून या जगात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
युट्यूबमध्ये फारसे काही शिकवण्यासारखे नाही किंवा त्या शिकण्याला मनोरंजनाची किनार असल्याने पालक मुलांना युट्युब शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्याची शक्यता जवळपास नाही! मात्र कोडिंगचे तसे नाही!!
आपले मूल जितक्या "लवकर" कोडिंग शिकायला सुरुवात करेल तितका तो "मोठा" म्हणजेच भरपूर पैसे मिळवणारा "प्रोग्रॅमर" होईल असा एक सर्वसाधारण समज आपल्याकडे आहे किंबहुना कोडिंगचे क्लासेस घेणाऱ्या मंडळींनी तो जाणूनबुजून पसरवला आहे, जोपासला आहे.
याचा अर्थ मुलांनी लहान वयात कोडिंग शिकूच नये का? तर जरूर शिकावे, मात्र ते शिकण्याची पद्धत वेगळी असावी, असे मला वाटते. कोणतीही प्रोग्रॅमिंग लँग्वेज किंवा आयडीइ (IDE) हे इतक्या वेगाने विकसित होत असतात की तुम्ही लँग्वेज किंवा आयडीइ स्पेसिफिक शिकलात तर तुमचे शिक्षण एक दोन वर्षातच आउटडेटेड होऊन जाते. त्यासाठी तुम्हाला सरावाची सवय ठेवावी लागते, तुमचे कौशल्य नवनवीन गोष्टी आत्मसात करत सातत्याने वाढवावे लागते.
म्हणूनच कोडिंग शिकताना प्रोग्रॅमिंग लँग्वेज किंवा आयडीइ शिकण्यावर जोर न देतात, ग्राहकाची गरज समजून घेणे, त्या गरजेप्रमाणे ग्राहकाला समजेल, परवडेल व आपल्यालाही फायदा मिळवून देईल असे सोल्युशन तयार करणे, ते सोल्युशन टिकाऊ, वापरायला सोपे कसे करायचे हे समजून घेणे या "प्रक्रिया" शिकण्यावर जोर देत प्रोग्रॅमिंग लँग्वेजला दुय्यम स्थान दिले पाहिजे.
आजकाल एक तासाचे फ्री सेशन देऊन मुलांना कोडिंगमध्ये कसा रस आहे हे पटवून देत, पालकांना हजारो किंवा लाखो रुपये फी भरायला लावण्याची त्यासाठी मुलाच्या करिअरचे नुकसान करू नका, असे इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याची पद्धत रूढ होत आहे.
सूज्ञ पालकांनी कृपया अशा आमिषाला अजिबात बळी पडू नये. माझ्या मागच्या पाच महिन्याच्या वैयक्तिक अनुभवावरून मी हे आत्मविश्वासाने व जबाबदारीने सांगू इच्छितो की मुलांना जर मोकळा वेळ व वातावरण दिले तर मुले त्यांची उत्सुकता भागवू शकेल व या प्रोग्रॅमिंग विश्वाचा आवाका लक्षात आणून देऊ शकेल एवढे कोडिंग सहज शिकतात.
त्यासाठी अनेक फ्री कोर्सेस, एडेक्स, कोर्सेरा सारख्या साईट्सवर मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयबीएम सारख्या नामांकित कंपन्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. अमेरिकीतील एमआयटी या संस्थेने स्क्रॅच सारखी प्रोग्रॅमिंगची मुलांना सहज वापरता येईल अशी ब्लॉक लँग्वेज तयार केली आहे. अवर ऑफ कोड, खान अकॅडमी सारखे रिसोर्सेस वापरून तीन ते चार मुले एकत्र येऊन, एकही पैसा खर्च न करता कोडिंग शिकू शकतात. त्याचबरोबर या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी संवाद करून, कोडिंग, त्याचा वापर, जॉब मिळवण्यासाठी त्याचा वापर होतो का? हे समजून सुद्धा घेऊ शकतात!
त्यामुळे जर तुम्ही हजारो रुपये भरून मुलाला कोडिंगचे क्लासेस लावणार असाल तर थोडे थांबा. मुलांना हे सगळे रिसोर्स मुक्तपणे हाताळू द्या. त्यामुळे त्यांचा कोडिंगमधला रस त्यांनाही समजेल. त्याचबरोबर एडेक्स, कोर्सेरा सारख्या साईट्सवर दिलेले कोर्स आधी "ऑडिट" करून घ्या, मुलांना जर रस वाटला, आवश्यक वाटले तरच सर्टिफिकेटसाठी पैसे भरा!!
जग वेगाने बदलतंय, या बदलांचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल तर "उचल पोराला आणि घाल क्लासला" या मानसिकतेतून बाहेर येऊन इंटरनेटमुळे जे "बौद्धिक लोकशाही व समानतेचे" वारे वाहू लागले आहे, त्याचा स्पर्श करून घ्यावाच लागेल!
महत्वाच्या लिंक्स
https://hourofcode.com/
https://www.khanacademy.org/
https://www.edx.org/learn/coding
https://www.coursera.org/courses?query=free%20courses%20programming
https://scratch.mit.edu/
चेतन एरंडे
This comment has been removed by the author.
ReplyDeleteWhitehatjr take 6500 for 8 session of 45 mins each. And that's basic . The course goes up to 99000.!
Deleteएरंडे साहेब, ८ - १० वर्षाच्या मुलांना शिकवलं जात अशा Scratch किंवा Python प्रोग्रामिंग साठी कोण हजारो / लाखो रुपये फी घेतं ? पुण्यातील मुक्तांगण Exploratory, पाबळ विज्ञान आश्रम कोथरूड केंद्र सारख्या नावाजलेल्या संस्था २०००- २५०० रुपयात हे शिकवतात !
ReplyDeleteदुसरी गोष्ट, ८ -१० वर्षाची मुलं उपजीविकेच्या साधनांचा विचार करतात आणि म्हणून ती प्रोग्रॅमिंग शिकायच्या मागे लागतात हा दावा पटत नाही, पालक मुलाना त्या दिशेला ढकलू बघतात हे एकवेळ पटेल, पण मुलं असा विचार करतात हा दावा चुकीचा वाटतो
तिसरी गोष्ट, कोडींग म्हणजे एक प्रोग्रॅमींग language शिकणे आणि ते सुद्धा IDE वापरुन, हा मोठ्ठा गैरसमज आहे - जेंव्हा कोडींग करून तुम्ही एखादा प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करता तेंव्हा - तुम्ही logically विचार करायला शिकता, चिकाटी शिकता, अडचणीतून मार्ग काढायला शिकता, communicate करायला शिकता, collaborate करायला शिकता. ही कौशल्ये महत्वाची आहेत आणि ही transferable life skills आहेत, या कौशल्यांपैकी अगदी एक जरी मुलांच्या हाताला लागलं तरी पुष्कळ मिळवलं अस म्हणायला हरकत नाही ..या साठी कोडिंग शिकणे महत्वाचे आहे
हे convince करायला , ८-१० वर्षांच्या मुलांसाठी, - software development life cycle, ग्राहकाची गरज समजून घेणे, त्या गरजेप्रमाणे ग्राहकाला समजेल... अशी पुस्तकी वाक्य छापायची गरज ती काय ?
आपण एकमेकांना ओळखतो का? तुमचा भाषेचा रोख कमालीचा आगाऊ आहे, म्हणून विचारले.
Deleteतुमच्या माहितीसाठी, मुले उपजीविकेचा विचार करून शिकतात हे मी हवेत फेकलेले वाक्य नाही. त्यासाठी पीटर ग्रे या बोस्टन विद्यापीठाच्या प्राध्यापकाने केलेल्या चाळीस वर्षाच्या संशोधनाचा भक्कम आधार आहे.
त्याविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर alliance for self directed education या वेबसाईटला भेट द्या किंवा त्यांचे free to learn हे पुस्तक वाचा.
सडबरी व्हॅली स्कुल या शाळेच्या वेबसाईटला भेट द्या, जिथे मुलांना पंख फूटतात हे पुस्तक वाचा आणि मग आठ दहा वर्षाच्या मुलांना ग्राहकांच्या गरजा समजतात का? याविषयी मत मांडा.
बाय दि वे, ज्या स्क्रॅच साठी तुम्ही सांगितलेल्या संस्था दोन ते तीन हजार रुपये घेतात ते सॉफ्टवेअर मुले फुकटात शिकतात एवढेच नाही तर अमेरिकेतील शिक्षणतज्ञाना त्याचा डेमो देतात, त्याची पोस्ट देखील या ब्लॉगवर आहे.
फेसबुकवर एक तासाचा फ्री डेमो देणारे किती फी घेतात, हेही तपासून घ्या.
तुम्हाला विषय मुळातून समजून घ्यायचा असेल तर तुमचे स्वागत आहे मात्र केवळ तुमचे मत सिद्ध करायचे असेल तर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर पोस्ट लिहिण्यासाठी स्वतंत्र आहात, हा माझा ब्लॉग असल्याने इथे मी माझेच विचार मांडणार..
माझ्या पोस्ट मधील भाषेचा रोख तुम्हाला आगाऊ वाटला त्या बद्धल अर्थातच मी दिलगिरी व्यक्त करतो- It was definitely not by design !
Deleteतुमच्या ब्लॉगला भेट देण्याचं तस कारण काहीच नाही, पण WhatsApp ग्रुप ,"मराठी विज्ञान समूहावर", ज्याचा मी एक तुमच्या सारखाच सभासद आहे, आलेली तुमची पोस्ट वाचुन तुमच्या ब्लॉगला भेट दिली.
या पोस्ट मधील खालील मजकूर मला तुमच्या ब्लॉग कडे घेऊन आला -
.... कृपया नक्की वाचा आणि शेअर करा जेणेकरून काही जणांचे तरी हजारो रुपये वाजतील व त्या पैशांतून ते मुलांना लॅपटॉप किंवा कॉम्पुटर घेऊन देऊ शकतील!!
असो, तुमच्या reply पोस्ट मधील मजकूर -
"तुमच्या माहितीसाठी, मुले उपजीविकेचा विचार करून शिकतात हे मी हवेत फेकलेले वाक्य नाही. त्यासाठी पीटर ग्रे या बोस्टन विद्यापीठाच्या प्राध्यापकाने केलेल्या चाळीस वर्षाच्या संशोधनाचा भक्कम आधार आहे."
त्याविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर alliance for self directed education या वेबसाईटला भेट द्या किंवा त्यांचे free to learn हे पुस्तक वाचा."
तुमच्या सल्ल्याप्रमाणे मी Free to learn या पुस्तकात तुमच्या वरच्या वाक्यासाठी आधार शोधायचा प्रयत्न केला, मला काय सापडलं ते खाली देत आहे ..
From Free to learn by Peter Gray
- The author is expressing his opinion - not a research finding -
"Going beyond Groos, I would add that children are naturally motivated to play not just at the skills that are most prominent and valued among adults around them, but also, even more intensely, at new skills that lie at the culture’s cutting edge. Because of this, children typically learn to use new technology faster than do their parents. From an evolutionary perspective, that is no accident. At a gut, genetically based level, children recognize that the most crucial skills to learn are those that will be of increasing importance in the future—the skills of their own generation, which may be different from those of their parents’"
बहुतेक याच्या अनुषंगाने तुम्ही तुमच मत बनवलं ते खाली देत आहे ..
"आजकाल मुले आठ दहा वर्षाची झाली रे झाली की दोन गोष्टी करण्याकडे त्यांचा कल दिसू लागतो. पहिली गोष्ट म्हणजे कोडिंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे युट्युब व्हिडियो.इवोलुशनरी सायकॉलॉजीच्या अंगाने विचार केला तर मुलांचा हा कल नैसर्गिक व साहजिक आहे. याचे कारण म्हणजे आजूबाजूला उत्तम उपजीविकेची खात्री देणाऱ्या मुलांना ज्या काही गोष्टी दिसतात त्यामध्ये आयटी आणि युट्यूब हे अव्वल स्थानावर आहेत आणि म्हणूनच मुले या क्षेत्रात आपले कौशल्य लवकरात लवकर सिद्ध करून या जगात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत."
वरचं पीटर ग्रे यांच मत होतं, त्यावर आधारित तुमच मत असावं, तुमच्या आणि पीटर ग्रे यांच्या मतात सुद्धा खूप अंतर आहे.
पण शेवटी ही opinions आहेत. याला research चा काही आधार असेल तर जरूर द्या, खास करून तुम्ही उल्लेख केलेल्या वयोगटातील (8 to 10) मुलांसाठी आणि उपजीविका (career/ livelihood)या संकल्पनेशी निगडीत !!
Thanks, I really appreciate your response and follow up. Please visit the ASDE website and go through below,
DeletePPORTUNITY TO PLAY WITH THE TOOLS OF THE CULTURE
Much of education has to do with learning to use the culture’s tools. The way to master any tool fully is to play with it, that is, to be creative with it, impose your will on it, make it do what you want it to do. In most traditional cultures the adults recognize this, and so the adults allow even little children to play with the real tools of the culture, even those that can cause injury, such as fire, knives, and bows and arrows.
Schools and learning centers for Self-Directed Education, and families involved in Self-Directed Education, allow children to play with the tools of our modern culture, such as computers, books, woodworking equipment, cooking utensils, and sporting equipment, though for some tools there may be an initial requirement of safety instruction.
also,
Adults in our culture often assume that it is their job to keep children more or less constantly busy. But the crucial lesson that children must learn is how to take control of their own life, and for that to happen we must back off. Our greatest gift to children, concerning their education, is free time to discover and pursue their own interests.