कोरोनाशी लढताना - भाग २
मुलांना भावनिक आधाराची गरज आहे, हे कसे ओळखावे?
मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे याचा अर्थ उठसुठ मुलांना मदत करत सुटायचे का?
तर बिलकुल नाही. अनेक मुले स्वतःला अशा कठीण काळात सहज सावरतात, त्यामुळे उगीचच हसणाऱ्या मुलाला आधी रडवून मग मदतीसाठी जाण्याची गरज नाही!
मुलांना आपल्या भावनिक आधाराची गरज आहे हे ओळखण्याची काही लक्षणं युनिसेफने सांगितली आहेत.
ती म्हणजे,
१. झोप व जेवण या दोन्ही गोष्टींमधील अनियमितता
२. रात्री दचकून उठणे
३. आक्रमकता किंवा कशातच रस न घेणे
४. दिनक्रमात किंवा आहारात विशेष बदल नसतानाही, डोकेदुखी व पोटदुखी विषयी सातत्याने तक्रार करणे
५. एकांताची भीती
६. छोट्या छोट्या गोष्टी ज्या इतरवेळी एकट्याने केल्या जात होत्या त्यासाठी मदत मागणे
७. एखादी नवीन भीती तयार होणे, जसे की टेरेसमध्ये जायला घाबरणे
८. खेळण्याचा कंटाळा करणे, खेळण्यात उत्साह नसणे
९. सतत दुःखी असणे, छोट्या छोट्या गोष्टींवरून रडू येणे
यापैकी कोणतीही लक्षणे सातत्याने दिसत असतील तर मुलांना भावनिक आधाराची गरज आहे, असे समजून मगच पुढील भूमिका ठरवावी.
मुलांना मदत करण्याच्या तीन पायऱ्या पुढील भागात..
©चेतन एरंडे
क्रमशः
Comments
Post a Comment