युनिसेफच्या म्हणण्यानुसार मुलं जेव्हा तणावपूर्ण परिस्थितीतून जात असतात, तेव्हा तीन प्रकारे आपण मुलांना मदत करू शकतो.
१. ऐकून घेणे
मुलांना ज्या ज्या वेळी आपल्याला काही सांगायचे असेल, आपल्याशी बोलायचे असेल, तर त्या वेळी इतर सगळी कामं बाजूला ठेवून सगळ्यात आधी मुलांचे म्हणणे ऐकले पाहिजे.
जर मुले स्वतःहून आपल्याशी बोलत नसतील, तर मुलं आपल्याशी संवाद करतील अशा संधी जसे की एकत्र जेवण करणे, गोष्ट सांगणे, एखादी एक्टिव्हिटी एकत्र करणे, अशा गोष्टी केल्या पाहिजेत.
पूर्वी तुमचा मुलांशी जेवढा संवाद होत्या त्याच्या किमान दहा पट जास्त वेळ तुम्हाला या काळात मुलांसाठी द्यायचा आहे.
२. आरामदायी, सौहार्दपूर्ण वातावरण
मुलांना घरात वावरताना, शांत, समाधानी व आश्वस्त वाटेल, असे वातावरण घरात निर्माण केले पाहिजे. त्यासाठी वर सांगितलेल्या गोष्टी जसं की गोष्ट सांगणे, एकत्र खेळणे हे तर केले पाहिजेच पण त्याचबरोबर मुलांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचे भरपूर कौतुक केले पाहिजे. जसे की घरकामाला मदत असेल, एखाद्या गोष्टीत धाडसीपणा दाखवला असेल, नियोजन कौशल्य दाखवलं असेल, तर त्याचे भरभरून कौतुक झाले पाहिजे. अर्थात हे कौतुक करताना, हे "मुलाचे" नसून त्याच्या "कृतीचे" कौतुक आहे याचे भान आपल्याला व मुलाला आहे, याची काळजी घेतली पाहिजे.
३. मुलांना मनात विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करणे
जर तुम्ही मुलांना हे पटवून देऊ शकलात की कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज आहेत, त्याची पुरेपूर तयारी तुम्ही केलेली आहे, तर मुलांच्या मनातील भीती कितीतरी पटीने कमी होते.
हे पटवून देताना मुलांना तुम्ही जी काही माहिती द्याल, जशी की तुम्ही हीच तयारी का केली? त्याच्यासाठी तुम्ही ज्याचा सल्ला घेतला त्याचा या विषयात काय अभ्यास आहे? हे सुद्धा सांगितले तर मुलांचा मनात या परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडण्याचा आत्मविशास निर्माण होतो.
पुढच्या भागात मुलांना वेळ द्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? हे आपण समजून घेणार आहोत.
©चेतन एरंडे
क्रमशः.
This post is based on the literature published by Unicef.
Comments
Post a Comment