Skip to main content

Posts

होमस्कुलिंग व मूल्यमापनाचे पर्याय

काही दिवसांपूर्वी आपण सगळेच एका बातमीने उत्साहित झालो होतो, ते म्हणजे जगातील काही बलाढ्य कंपन्यांनी इथून पुढे नोकरी देताना मार्कलिस्ट किंवा सर्टिफिकेट नसतानाही नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. काही विद्यापीठे सुद्धा मार्कलिस्ट न बघता उच्च शिक्षणासाठी प्रवेश देऊ लागली आहेत. ही आनंदाची बातमी आहे, हे नक्की. किंबहुना सध्या मार्क बघून नोकरीसाठी मुलाखतीला बोलावलेल्या अनेक उमेदवारांकडून अनेक कंपन्यांची जी निराशा होत आहे, त्यामुळे अनेक जण भविष्यात असे निर्णय घेऊ लागतील, हेही खरे आहे. मात्र मार्कलिस्ट किंवा सर्टिफिकेट नसताना नोकरी कुणाला द्यायची, किंवा विद्यापीठात प्रवेश कसा द्यायचा हे त्या कंपन्या व विद्यापीठे कसे ठरवतील, हे बघणे अत्यंत महत्वाचे आहे. मार्कलिस्ट व सर्टिफिकेटच्या मदतीने गुणवत्ता सिद्ध करणे, हे तसे खूपच सोपे आहे. त्यासाठी लागणारी व्यवस्था मागच्या शंभराहून अधिक वर्षे चालवली जात आहे. त्यामुळे पालकांच्या व मुलांच्या व नोकरीसाठी अर्जाची पडताळणी करणाऱ्यांना ती चांगलीच अंगवळणी पडली आहे. या पलीकडे जाऊन गुणवत्ता सिद्ध याचा मात्र आपल्याला पहिल्या पासून विचार करावा लागेल त्या...

आनंददायी शिक्षणाची इमारत

आनंददायी शिक्षणाची इमारत मागच्या काही दिवसातील मनात विचारांचे वादळ उठावे , असे तीन चार प्रसंग एकामागून एक माझ्या समोर आले. प्रसंग -१ लहान मुलांसाठी एका सोसायटीत आयोजित केलेल्या "खेळातून विज्ञान" या कार्यक्रमात जशी मुले रमली होती तशी मोठी माणसे सुद्धा रमली होती. विज्ञान इतक्या सोपे पद्धतीने शिकता येऊ शकते हे त्यांना नव्यानेच समजले. विज्ञानातील मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी मोठ्या प्रयोगशाळांची नाही तर इच्छाशक्तीची व वेळ देण्याची गरज आहे , हे पालकांच्या हळुहळु लक्षात येते आहे , असे मला जाणवले. प्रसंग -२ अकरा वर्षाचा सोनीत पुण्यातील बाणेर टेकडीवर पृथ्वीच्या जन्माची कहाणी पुराव्यानिशी आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगत होता. त्याच्याकडून मुलांना जशा नवीन गोष्टी समजत होत्या तशा आम्हाला पालकांना सुद्धा नव्यानेच समजत होत्या. कितीतरी वेळा त्या टेकडीच्या जवळ जाऊनही हे सगळे   नक्की कसे निर्माण झाले असावे , असा प्रश्न गेल्या चाळीस वर्षात आम्हाला कुणालाच कधी पडला नाही. मात्र तोच प्रश्न सोनीतला अकराव्या वर्षी पडला व त्याने त्याचे उत्तरही शोधून काढले! प्रस...

सुरुवात शिकण्याच्या मुळाशी जाण्याची - भाग 3

लाखो वर्षे माणूस निरनिराळ्या गोष्टी शिकत आला आहेच. काळानुसार शिकण्याची साधने जरी बदलत गेली असली , तरी "शिकणे" ही प्रक्रिया शाश्वत आहे , व ती "शाश्वत" प्रक्रिया जर आपण समजून घेऊ शकलो , तर कदाचित "मूल शिकते कसे ?" व त्यातून त्याचा उत्क्रांतीमध्ये नकळत हातभार कसा लागतो , या प्रश्नाचे कदाचित एक वेगळेच उत्तर आपल्याला मिळू शकेल! म्हणूनच ही प्रक्रिया शोधण्यासाठी मी पुन्हा एकदा उत्क्रांती समजून घेऊ लागलो. त्यातून मला माणूस उत्क्रांतीच्या कोणत्याही टप्प्यावर असला तरी एक समान प्रक्रिया घडताना दिसली, ती म्हणजे "आपल्या आजूबाजूच्या जगाचे सतत अत्यंत बारकाईने निरीक्षण करणे. त्यासाठी भरपूर वेळ देणे. निरीक्षणातून टिपले गेलेले बदल किंवा नवीन गोष्टी प्रत्यक्ष कृतीतून व स्वतःच्या हाताने तपासून पाहणे. त्यांचे आकलन करून घेणे, त्यासाठी इतर माणसांशी संवाद साधणे. सरतेशेवटी या नवीन गोष्टीमुळे रोजच्या जगण्यात काही चांगले बदल होतात का हे जगता जगता तपासून घेणे, जर चांगले बदल झालेले दिसले तर जुन्या व्यवस्थेला किंवा परंपरांना कवटाळून न बसता   नवे बदल स्वीकारून, प्रगत...

सुरुवात - शिकण्याच्या मुळाशी जाण्याची - भाग १

विचार करणे ही माणसाची तशी नैसर्गिक प्रवृत्ती. त्यामुळे प्रत्येक माणूस हा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे विचार करत असतोच. मग ते शिक्षणाविषयी असतील, मुलांच्या संगोपनाविषयी असतील किंवा स्वतः च्या उपजीविकेविषयी असतील. प्रत्येक माणूस विचार करत असतो पण फार थोडीच माणसे विचार करून सुखी व समाधानी झालेली दिसतात. असे का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना मला असे जाणवले की केवळ विचार करणे व त्या विचारांच्या आधारावर कृती करणे, ही प्रक्रिया पुरेशी नाही. तर सगळ्यात महत्वाचे आहे, ते म्हणजे तुमच्या अनुभव विश्वाचा आवाका वाढवणे, ज्यामुळे तुमचे विचार समृद्ध होतील व कृती करताना तुम्ही कल्पनाही केली नसेल असे अनोखे पर्याय तुमच्याकडे असतील. पण हे नक्की असेच आहे का, हे समजून घेण्यासाठी मी यु ट्यूब च्या मदतीने थेट उत्क्रांती पासून सुरुवात करायचे ठरवले. त्यामुळे मला आवाका वाढवता आलाच, शिवाय काही गोष्टींची उत्तरे मिळत आहेत, असे वाटू लागले. त्या अनुभवावर आधारित मी माझी निरीक्षणे दोन भागात माझ्या ब्लॉगवर मांडायचे ठरवले. मला माहिती नाही की हा विषय थेट शिक्षणाशी किंवा पालकत्वाशी संबंधि...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...

माहिती तंत्रज्ञान - माहितीच्या जगात जबाबदार नागरीक होण्यासाठी - भाग २

माहिती तंत्रज्ञान - माहितीच्या जगात जबाबदार नागरीक होण्यासाठी - भाग २   (टीप: या लेखाचा उद्देश तांत्रिक माहिती पुरवणे, हा नसून, किमान तांत्रिक माहिती मिळवणे कशी आवश्यक आहे, याविषयी माझे निरीक्षण मांडणे हा आहे.)   आपण केलेल्या पोस्ट वर अनेकदा वादविवाद होतात, कधीकधी ते टोकालाही जातात. एखाद्या ठिकाणी वाद होतोय, असे दिसले की आपण ताबडतोब, तो विषय इतर चांगल्या गोष्टींकडे वळवून, नकारात्मक प्रतिक्रिया न देता, कधी हास्य विनोदातून तर कधी गरज असेल तर माफी मागून, तो विषय थांबवायला शिकले पाहिजे. कारण माहितीच्या युगात माणसे जितक्या वेगाने जोडली जातात, तितक्याच वेगाने जुने संबंध असलेली माणसे तुटू शकतात. आपण शक्यतो राजकीय, जातीयवादी, पंथवादी, कुत्सित, सतत एकच बाजू मांडणारे लिखाण करणे किंवा पोस्ट शेअर करणे सहज टाळू शकतो. इंटरनेटवर आर्थिक व्यवहार करताना, आपल्या बँकेने दिलेल्या सर्व सुरक्षा विषयक सूचना आपण शांतपणे वाचणे व त्यानंतरच व्यवहार करणे, हे आपल्या अकौंट वर दरोडा पडून नये यासाठी आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार करताना, त्या वेबसाईटच्या नावाच्या आधी हिरव्या रंगाच्या बंद कुलुपाचे च...

माहिती तंत्रज्ञान - भाग १ - माहितीच्या जगात जबाबदार नागरीक होण्यासाठी....

माहिती तंत्रज्ञान - भाग १ (टीप: या लेखाचा उद्देश तांत्रिक माहिती पुरवणे, हा नसून, किमान तांत्रिक माहिती मिळवणे कशी आवश्यक आहे, याविषयी माझे निरीक्षण मांडणे हा आहे.)    कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की एक तर आपण घाबरून जातो किंवा त्या तंत्रज्ञानाची पूर्ण ओळख करून न घेता, त्याचा अंदाधुंद वापर करू लागतो. दोन्ही प्रकारामध्ये आपलेच नुकसानच होण्याची शक्यता असते. मुळात कोणतेही तंत्रज्ञान हे विघातक किंवा विधायक असणे, हे त्या तंत्रज्ञानावर नव्हे, तर त्याच्या वापरावर अवलंबून असते. गेल्या काही वर्षापासून सगळीकडे बोलबाला असलेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा, हे तितकेच खरे आहे. आपला माहिती तंत्रज्ञानाशी दैनंदिन जीवनात संपर्क येतो, तो मुख्यत: इंटरनेटच्या माध्यमातून. सोशल मिडीयाचा वापर, इंटरनेट बँकिंग, ईमेल व  ऑनलाईन शॉपिंग च्या रूपाने आपण माहिती तंत्रज्ञानाशी जोडले जातो. हे सगळे वापरत असताना आपण कोणती काळजी घ्यावी, याविषयी मला जे उमगले ते मी तुमच्या पर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. इंटरनेट च्या दुनियेत आपला प्रवेश होतो, तो पासवर्डच्या मदतीने. आपल्या मौल्...