आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग १ मागच्या वर्षी आम्ही आमचा होमस्कूलिंगचा प्रवास लोकसत्ताचे चतुरंग पुरवणीत मांडला होता. सध्या अनेकजण होमस्कूलिंगविषयी विचारणा करत असल्याने हा लेख तीन ते चार भागात पुन्हा एकदा ब्लॉगवर पोस्ट करत आहे. तसेच या लेखाचे लवकरच माझ्या युट्युब चॅनेलवर वाचन करण्याचा देखील विचार आहे. त्याविषयी लवकरच पोस्ट करेन. " मला थ्रीडी डिझाईन आणि ऍनिमेशन करायला खूप आवडत , मला ते शिकायचंय " आमच्या तेरा वर्षाच्या मुलाने , स्नेहने हे सांगताच सुजाण भूमिकेत शिरून मी व प्रीती त्याच्यासाठी थ्रीडी डिझाईनचा क्लास शोधून काढला . मात्र स्नेहला त्या क्लासची सगळी माहिती देऊन , " तू हा क्लास करशील का ?" असे विचारताच त्याने ठाम नकार दिला . त्याचा नकार बघून आम्ही जरी हा विषय सोडून दिला तरी त्याने मात्र हा विषय सोडून दिला नव्हता ! तो झाडून कामाला लागला . जमतील तेवढे ऑनलाईन प्लँटफॉर्म पालथे घातले आणि ब्लेंडर नावाचे एक थ्रीडी डिझाईन सॉफ्टवेअर असते असा शोध लावला . नुसता शोध लावून तो थांबला नाही...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.