Skip to main content

सध्या इंटरनेटवरून ज्याप्रमाणे आपण माहिती मिळवत आहोत, तशीच इंटरनेटवर कळत नकळत आपलीही माहिती पुरवत आहोत! त्यामुळे जर आपल्याकडे किमान "माहिती साक्षरता" नसेल, तर पूर्वीच्या काळी सावकार जसे अडाणी माणसांना फसवून लुबाडत होते, तसेच आपल्यालाही कुणीतरी लुबाडेल!


माहिती साक्षरता - भाग १


आपल्या जीवन पद्धतीमध्ये काळानुसार सतत बदल होत असतो. तो पूर्वीही होत होता, आत्ताही होत आहे व इथून पुढेही होणार आहे. म्हणूनच "आमच्या काळी" अशी सुरुवात करून उगाचच आत्ताचा काळ किती भयानक वगैरे आहे, अशा चर्चांना एक करमणुकीचे साधन यापलीकडे फारशी किंमत नसावी.

जशी जीवनपद्धती बदलते, तशा अनेक संकल्पनाही बदलतात. मग ते दळणवळण असो, संपर्क असो किंवा नोकरी असो. अशीच वेगाने बदलत जाणारी एक संकल्पना म्हणजे साक्षरता..
एकेकाळी पाठांतर उत्तम असणे, हे साक्षरतेचे लक्षण होते. त्यानंतर लिहिता वाचता येणे ही साक्षरतेची कसोटी झाली. मग संगणक साक्षरता हे साक्षरतेचे लक्षण मानले जाऊ लागले. साक्षरतेची अशी संकल्पना बदलत जाण्यामागे मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानातील बदल त्यानुसार उपलब्ध होणारी नवनवीन साधने..

संगणकाची उपलब्धता व उपयुक्तता वाढल्यामुळे संगणक साक्षरतेला महत्व आले. सध्याचा काळ बघितला तर केवळ संगणक वापरून काम करता येणे महत्वाचे नसून, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचे विश्लेषण करणे, त्याआधारे त्या माहितीचा, तंत्रज्ञानाचा किमान वापर आपल्याला करता येणे, हे जास्त महत्वाचे ठरत आहे.

सध्या इंटरनेटवरून ज्याप्रमाणे आपण माहिती मिळवत आहोत, तशीच इंटरनेटवर कळत नकळत आपलीही  माहिती पुरवत आहोत! त्यामुळे जर आपल्याकडे किमान "माहिती साक्षरता" नसेल, तर पूर्वीच्या काळी सावकार जसे अडाणी माणसांना फसवून लुबाडत होते, तसेच आपल्यालाही कुणीतरी लुबाडेल!

आपल्यापैकी अनेकजण कदाचित "माहिती साक्षर" काही सुशिक्षितही असतील. मी नुकताच "माहिती साक्षरतेचा" एक कोर्स पूर्ण केला आहे, त्यामुळे अर्थातच मी मात्र नवसाक्षर आहे! कदाचित त्यामुळेच या कोर्समधून एक जबाबदार "Digital Citizen" असणे म्हणजे काय हे मला जे उमगले ते कुणालातरी कधी एकदा सांगतोय असे मला झाले आहे! म्हणूनच माझ्या ब्लॉग वरून पुढचे काही दिवस साधारण तीन भागात, ते तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करत आहे.  

कदाचित ही माहिती तुम्हाला तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांना जबाबदार "Digital Citizen" म्हणजे काय हे सांगण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून तीन भागामध्ये मांडत आहे.

जरूर वाचा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
©चेतन एरंडे. - २३ जून २०१८


Comments

  1. Very important topic Chetan sir. Eager to share your experience and learning.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कुलिंग व सोशलायजेशन - भाग १

होमस्कुलिंग व सोशलायजेशन - भाग १ होमस्कुलिंग व सोशलायजेशन याविषयी अनेक पालक सतत आम्हाला प्रश्न विचारात असतात. म्हणून मी दोन भागात या विषयावर लिहित आहे. पुण्यापासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर साने गुरुजी स्मारक येथे एक पाच दिवसांचे निवासी शिबीर दरवर्षी होते . महाराष्ट्रातील वे ग वेगळ्या भागातून सुमारे पन्नास मुलांना तिथे पाच दिवस आई वडिलांपासून लांब स्वावलंबी जीवन जगण्याची व वेगवेगळ्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते . अशा ठिकाणी , म्हणजेच साने गुरुजी स्मारकाच्या अभिव्यक्ती शिबिरामध्ये, जिथे त्याच्या व आमच्या ओळखीचे कुणीही नाही तिथे आमच्या अकरा वर्षाच्या मुलाला म्हणजे स्नेहला पाठवायचा निर्णय यंदा आम्ही घेतला . त्यात काय विशेष , असे तर आम्हीही करतोच की , असे तुम्ही म्हणणे स्वाभाविक आहे. बरोबर , बरेच पालक असे करतात , पण या घटनेतील वैशिष्ठ्य हे आहे , की आमचा स्नेह मागची तीन वर्ष शाळेतच गेलेला नाही , तो स्वअध्ययन म्हणजेच होमस्कुलिंग करतो . तो होमस्कुलिंग ...