आजकाल मुले आठ दहा वर्षाची झाली रे झाली की दोन गोष्टी करण्याकडे त्यांचा कल दिसू लागतो. पहिली गोष्ट म्हणजे कोडिंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे युट्युब व्हिडियो. इवोलुशनरी सायकॉलॉजीच्या अंगाने विचार केला तर मुलांचा हा कल नैसर्गिक व साहजिक आहे. याचे कारण म्हणजे आजूबाजूला उत्तम उपजीविकेची खात्री देणाऱ्या मुलांना ज्या काही गोष्टी दिसतात त्यामध्ये आयटी आणि युट्यूब हे अव्वल स्थानावर आहेत आणि म्हणूनच मुले या क्षेत्रात आपले कौशल्य लवकरात लवकर सिद्ध करून या जगात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. युट्यूबमध्ये फारसे काही शिकवण्यासारखे नाही किंवा त्या शिकण्याला मनोरंजनाची किनार असल्याने पालक मुलांना युट्युब शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्याची शक्यता जवळपास नाही! मात्र कोडिंगचे तसे नाही!! आपले मूल जितक्या "लवकर" कोडिंग शिकायला सुरुवात करेल तितका तो "मोठा" म्हणजेच भरपूर पैसे मिळवणारा "प्रोग्रॅमर" होईल असा एक सर्वसाधारण समज आपल्याकडे आहे किंबहुना कोडिंगचे क्लासेस घेणाऱ्या मंडळींनी तो जाणूनबुजून पसरवला आहे, जोपासला आहे. याचा अर्थ मुलांनी लहान वयात कोडिंग शिकूच नये का? तर ज...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.