Skip to main content

Posts

Showing posts from 2022

मुलांशी काय बोलायचं? भाग २

मागच्या भागात आपण मुलांशी संवाद सुरु करायला मदत करतील अशा पाच गोष्टींची माहिती करून घेतली होती.  आज या दुसऱ्या व शेवटच्या भागात आपण पुढच्या पाच गोष्टींची माहिती करून घेऊ.  ६. असे कोणते प्रसंग आहेत, ज्यामध्ये तू "आऊट ऑफ कंट्रोल" होतोस असं तुला वाटतं?  हे असं आऊट ऑफ कंट्रोल होणं हे अनेकदा मुलांनाही आवडत नाही. पण असे जर प्रसंग जर आपल्याला कळाले तर आपण अशा वेळी भावना नियंत्रित कशा कराव्यात, यासाठी त्यांची मदत करू शकू.  ७. तुझ्यामध्ये कोणती "बेस्ट क्वालिटी" आहे असं तूला वाटतं?  आपण असं मानतो की प्रत्येक मूल हे "युनिक" आहे. हा युनिकनेस शारीरिक ठेवणीमुळे जसा येतो तसा व्यक्तिमत्वातल्या पैलूंनी सुद्धा येतो! मुलांशी संवाद करता करता मुलांना  स्वतःच्या अंगभूत क्षमतांविषयी आणि कौशल्यांविषयी काय वाटते हे समजून घेऊन, ती कौशल्ये व क्षमता स्वतःच्या आणि जगाच्या चांगल्यासाठी कशा वापरता येतील, याविषयी आपण त्यांना मदत करू शकतो.  ८ एखादी गोष्ट तुला सोडून द्यावीशी वाटते, तेव्हा तू तुझ्या मनाला काय सांगतोस?  मुलांची धरसोड वृत्ती हा अनेक पालकांच्या चिंतेचा ...

मुलांशी काय बोलायचं? भाग १

  मुलांशी काय बोलायचं? भाग १  मला आठवतंय मी होमस्कुलिंग म्हणजे काय? या विषयांवर बोलण्यासाठी एका पालक गटाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे मला एका पालकांनी विचारलेला प्रश्न आश्चर्यचकित करणारा होता. तो म्हणजे "होमस्कुलिंग करता म्हणजे तुमचं मूल सारखं तुमच्या डोळ्यासमोर असणार. मग तुम्हाला ते "इरिटेट" होत नाही का? सारखं त्याच्याशी बोलत राहण्याचा कंटाळा येत नाही का? आमचं मूल सुट्टीच्या दिवशी घरी असलं तरी त्याच्याशी सारखं काय बोलायचं हा प्रश्न पडतो? मग तुम्ही नक्की बोलता तरी काय?"  त्यावेळी मी या प्रश्नाला फक्त हसून उत्तर दिलं! आपल्या मुलाशी काय बोलायचं, असा प्रश्न पालकांना पडत असेल का? हा विचार मनात तेव्हापासून घोळत असताना मला काही दिवसांपूर्वी रिबेका रोलंड यांनी लिहिलेल्या "थी आर्ट ऑफ टॉकिंग विथ चिल्ड्रेन" या नावाच्या एका पुस्तकाविषयी कळलं. मी हे पुस्तक पूर्ण वाचलेलं नसलं तरी या पुस्तकात मुलांशी काय बोलावं याविषयीच्या टिप्स मला वाचायला मिळाल्या, त्या सोप्या करून इथे मांडायचा मी प्रयत्न करतोय.  १. तू मला काय शिकवशील?  या वाक्याने मुलांशी संवादाला सुरुवात करू...

वेध होमस्कुलिंगचे - भाग २ - आपले स्टेकहोल्डर्स व आजूबाजूचे वातावरण

होमस्कुलिंगच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी, "होमस्कुलिंग करण्याचे नक्की कारण" आपल्याला माहिती असले पाहिजे, हे आपण मागील भागात बघितले. हे कारण शोधत असताना, आमच्या अनुभवावरून मी असे सांगू शकतो की होमस्कुलिंगचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा विनियोग करण्याची अत्यंत महत्वाची ताकद आपल्याला मिळते. त्याचबरोबर वेळेचे नियोजन मुलांच्या कलाने करून, त्यांची ऊर्जा, शिक्षणाची साधने व पद्धत ठरवण्याचे महत्वपूर्ण स्वातंत्र्य आपल्याला मिळते. यामुळे मुलांचे केवळ पुस्तकी शिक्षण न होता एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मुलांना सर्वांगीण शिक्षण मिळवण्याची संधी आपण देऊ शकतो. आता आपल्याला होमस्कुलिंग का करायचे याचे उत्तर शोधता आले की आपल्याला जो पुढचा प्रश्न घ्यायचा आहे तो म्हणजे आपले स्टेकहोल्डर्स कोण आहेत, म्हणजेच या निर्णयाचा परिणाम कुणावर होऊ शकतो आणि या निर्णयावर परिणाम कोण करू शकतात यांची यादी तयार करणे. या यादीत आपण स्वतः, मूल, आपले नातेवाईक, कदाचित शेजारी, मूल शाळेत जात असेल तर त्याची सध्याची शाळा, स्कुल व्हॅन चालक, मुलाचे मित्र, मुलगा होमस्कुलिंग करू लागल्यावर, ओपन स...

वेध होमस्कुलिंगचे - भाग १ - होमस्कुलिंग का?

  साधारणपणे मे महिन्यापासून होमस्कुलिंग विषयी चौकशी करणाऱ्या पालकांची संख्या वाढू लागते. गेले वर्षभर माझा एकूणच सोशल किंवा एकूणच मीडियावरचा वावर कमी झाल्याने, फोन येण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी तुरळक फोन्स अजूनही येत असतात. होमस्कुलिंग सुरू करताना, पालकांच्या मनात अनेक प्रश्न असणे स्वाभाविक आहे. होमस्कुलिंग करण्याचा निर्णय घेण्यापर्यंत जेव्हा पालक येतात याचाच अर्थ प्रचलित शिक्षणव्यवस्थेने त्यांच्यापुढे असे काही प्रश्न उभे केले आहेत, ज्यांची उत्तरं आता व्यवस्थेबाहेर येऊनच शोधावी लागणार आहेत. ८ वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा व्यवस्थेच्या बाहेर पडलो तेव्हा आम्ही बेसिक पूर्वतयारी केली असली तरी आज ज्या प्रमाणात रिसोर्सेस, माहिती आणि माहिती देण्याची तयारी असलेले पालक आहेत, तेव्हढे तेव्हा नव्हते. त्यामुळे आता जे पालक होमस्कुलिंगचा निर्णय घेण्यापर्यंत आले आहेत, त्यांना या मार्गावर चालण्यासाठी अगदी हमरस्ता जरी नसला तरी किमान भरवश्याची पायवाट नक्की तयार झाली आहे. त्यामुळे पालकांनी हा निर्णय घेताना जर थोडीशी पण योग्य तयारी केली तर त्यांचा पुढचा प्रवास आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा होईल हे नक्की...

आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग ५

 आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग  ५  मार्चपासून कोरोनामुळे जवळपास सगळ्याच मुलांना नाईलाजाने का होईना " होमस्कुलिंग " करावे लागत आहे . मार्चमध्ये ही गोष्ट लक्षात आल्यानंतर स्नेहने आमच्या सर्जनशील पालक या समूहातील काही शाळेत जाणाऱ्या पण " जबरदस्तीने " होमस्कुलिंग करणाऱ्या मुलांना एकत्र घेऊन ऑनलाईन प्रोग्रॅमिंग शिकायला सुरुवात केली . ही शिकण्याची प्रक्रिया पूर्णपणे मुलांच्या नियंत्रणात होती . कोणत्याही मोठ्या व्यक्तीची इंटरनेट उपलब्ध करून देण्यापलीकडे कोणतीच भूमिका नव्हती . या उपक्रमातून स्नेह , निधी , कैवल्य , अनिश , आयुष , ज्ञानेश , अर्जुन व साकेत या मुलांनी मागच्या चार महिन्यात स्वतःहून दोन प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकल्या एवढेच नाही तर मुले स्वतःहून कशी शिकतात याचे प्रात्यक्षिक त्यांनी अमेरिकेतील शिक्षणतज्ज्ञांना अर्थातच ऑनलाईन दिले ! सध्या काही मुलांच्या ऑनलाईन शाळा व क्लासेस सुरु झाल्याने वेळ मिळत नसल्याने ही मुले पहाटे पावणे सहाला भेटून प्रोग्रॅमिंग शिकतात . ' आमची...

आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग ४

  आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग ४ परीक्षा हे आपल्या शिक्षणव्यवस्थेने व समाजाने स्वीकारलेले मूल्यमापनाचे एक साधन आहे. त्यामुळे परीक्षा, मार्क यांचा शिकण्याच्या प्रक्रियेशी काडीचाही संबंध नाही, परीक्षेशिवाय, खरं तर परीक्षा नसतील तरच मुले मनापासून शिकतात, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे म्हणूनच डॉक्टर यशपाल यांच्या समितीने आठवीपर्यंत परीक्षा ही मूल्यमापनाची पद्धत रद्द करत सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापनाची पद्धत रूढ करायचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर टाकायला आणि नातेवाईकांना दाखवायला मार्कलिस्ट मिळण्याची बंद झाल्याने पालकांनी हा प्रयत्न हाणून पाडला! असो. होमस्कुलिंग करणाऱ्या मुलांना परीक्षा हे मूल्यमापनाचे साधन वापरत येते का? तर हो येते. शाळेत मुले दरवर्षी परीक्षा देतात मात्र होमस्कुलिंग करत असताना जर तुम्ही महाराष्ट्र मुक्त शिक्षण बोर्डात प्रवेश घेतला तर तुम्ही पाचवी व आठवीची परीक्षा व नंतर दहावीची परीक्षा देऊ शकता. या परीक्षा सर्व विद्यापीठांमध्ये ग्राह्य धरल्या जातात. जर तुम्हाला केवळ पाचवी व आठवीची परीक्षा देण्याऐवजी पहिलीपासून परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही एनआयओएस कडून पहिली ते तिस...

आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग ३

आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग ३   अनेकदा होमस्कुलिंग करण्याचा निर्णय आधी पालक घेतात आणि मग तो मुलांना सांगितला जातो . मात्र बेळगावच्या रावी कोडबागेच्या बाबतीत हे एकदम उलटे होते . शाळेत होणारी कुचंबणा , शारीरिक शिक्षा आणि जे आवडतंय ते शिकायला न मिळणे यामुळे कित्येक दिवसांपासून होमस्कुलिंग करायचा तिने तगादा लावला होता . रावीच्या आईने मग वर्षभर बेळगावमधील काही पालकांना सोबत घेऊन शिक्षणावरील वेगवेगळी पुस्तके वाचली . मुलांचे भातलावणीपासून ते वेगवेगळ्या ठिकाणांना एकत्र भेटी देण्याचे उपक्रम आयोजित केले . मुलांना शाळेपासून स्वातंत्र्य दिल्यानंतर मिळणारा मोकळा वेळ कसा वापरायचा ? हे समजतंय व त्यासाठी त्यांना आता आपण हवी ती मदत करू शकतो ही खात्री पटताच रावीला होमस्कुलिंग करायची परवानगी मिळाली . रावी सध्या तिच्यासारखे बेळगावमध्ये अजून मित्र मैत्रिणी मिळतात का याचा शोध घेत आहे !   स्नेहच्याच वयाचा मित चांदगुडे असाच शाळेला कंटाळला . शाळा त्याला समजून घेत नसल्याने व त्याला...

आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग 2

  आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग  २ पहिली दोन वर्षे क्रमिक पुस्तकांच्या मदतीने शिकत असताना मोकळ्या वेळाचा उपयोग ज्या गोष्टी अजून समजून घ्यायच्यात त्या पुस्तकाच्या बाहेर जाऊन म्हणजे कधी थेट निसर्गात जाऊन , कधी एखाद्या संस्थेत जाऊन , कधी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीला भेटून तर कधी इंटरनेटच्या मदतीने समजून घ्यायला सुरुवात झाली . होमस्कुलिंगच्या तिसऱ्या वर्षांपासून स्नेहची आधी पुस्तकातून शिकणे व मग ते पडताळण्यासाठी बाहेर पडणे ही प्रक्रिया बरोब्बर उलटी झाली . आता स्नेह बाहेरच्या जगाशी जास्त जोडला गेला आणि त्या जगातले प्रश्न सोडवण्यासाठी कधी पुस्तके तर कधी ऑनलाईन साधने यांची मदत घेऊ लागला .   आम्ही आता फक्त त्याला शिकण्यासाठी लागणारे वातावरण निर्माण करणे व साधने उपलब्ध करून देणे , ती साधने वापरताना काय काळजी घेतली पाहिजे , हे सांगणे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे एवढेच करत होतो .   स्नेहची स्वतःहून शिकण्याची प्रक्रिया अनुभवत अस...