३३ वर्षे बालकारणाचा व १० वर्षे राजकारणाचा अनुभव असलेल्या माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांच्याशी झालेल्या संवादातील दहा महत्वाच्या गोष्टी!
टाईम मशीन - भाग ८ पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि बालरंजन केंद्राच्या प्रमुख माधुरीताई सहस्रबुद्धे यांच्याशी सर्जनशील पालक समूहाच्या पालकांनी टाईम मशीन या उपक्रमात बालकारण व राजकारण या क्षेत्रातील करिअरविषयी गप्पा मारल्या. सुरुवातीला ताईनी त्यांच्या बालपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास सांगितला. त्यांच्या सेशनमधील प्रत्येक मिनिट इतका माहितीपूर्ण होता कि संपूर्ण सेशनवर एक पुस्तक लिहून होईल! त्यामुळेच मला त्या सेशनमधून ज्या दहा महत्वाच्या गोष्टी समजल्या त्या मी इथे मांडतोय. १. ताईंच्या हरहुन्नरी , कार्यक्षम आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्वामागे त्यांच्या कुटुंबाचा, आई, वडिलांचा, आजी, आजोबांचा खूप मोठा वाटा आहे. हे सगळेच प्रचंड "ऍक्टिव्ह" असल्याने ताईंना आपण आजकाल मुलांना पाठवतो तशा वेगळ्या ऍक्टिव्हिटी सेंटरची गरजच भासली नाही! मुले ऍक्टिव्ह हवीत असे ज्या पालकांना वाटते, त्यांना स्वत;ला अधिक ऍक्टिव्ह व्हावे लागेल. २. आपल्या मुलांशी वागताना सिग्नल सारखं वागलं पाहिजे. ग्रीन सिग्नल कधी दाखवायचा, रेड सिग्नल कधी दाखवायचा आणि येलो सिग्नल कधी दाखवायचा हे जमणे महत्वाचे आह...