Skip to main content

मुलांच्या शिक्षणाचे व्यावहारिक प्रयोग - मुले स्वत;हून शिकू शकतात - भाग २





मुले नैसर्गिक प्रेरणेने आपोआप शिकतात. हे वाक्य टीव्ही चॅनेलवर, भाषणात आणि पेपरमधल्या लेखात फेकायला चांगले असले तरी "सांगा बरं, आपोआप शिकण्याच्या पायऱ्या कशा असतात?" असे म्हणल्यावर मात्र भंबेरी उडते!



मला स्वतःला सुदैवाने मुले स्वतःहून कशी शिकतात हे कुठे मांडायचे नव्हते तर आचरणात आणायचे होते त्यामुळे मला थिअरी थेट कृतीला जोडण्याशिवाय पर्याय नव्हता!! 
या "अगतिकतेतून" मला सगळ्यात आधी तर मूल निसर्गात: स्वतःहून कसे शिकते याच्या पायऱ्या नीट मांडता येणे व दैनंदिन निरीक्षणे व अनुभव त्या पायऱ्यांशी जोडून सातत्याने आवश्यक बदल करणे गरजेचे किंवा अपरिहार्य होते.

हे समजून घेण्यासाठी आपण सायकल व दुचाकी याचे उदाहरण घेऊया. सायकल चालवण्यासाठी प्याडल मारावे लागतात तर दुचाकी स्वयंचलित असते, स्वतः;हुन चालते. आता दुचाकी स्वयंचलित आहे म्हणून आपण डोळे मिटून दुचाकी चालवतो का? ती जरी स्वयंचलित असेल तरी आपण किक मारणे, गाडीत पेट्रोल आहे का? ते बघणे, चाकात हवा आहे का ते बघणारे, वेळेवर सर्व्हिस करणे, हे करतोच की.

या बदल्यात आपल्याला काय मिळते? तर प्याडल मारण्यासाठी आपली जी ऊर्जा खर्च होत होती ती आपण आता योग्य ठिकाणी वापरू शकतो, त्याचबरोबर आपला वेळ देखील वाचतो. ऊर्जा आणि वेळ वाचल्याने काय झाले? तर आपल्या क्षमतेमध्ये वाढ झाली. म्हणजेच आपोआप चालणाऱ्या गोष्टी, आपोआप होणारे शिक्षण हे जर व्यवस्थित समजून घेतले, व्यवस्थित वापरले तर माणूस म्हणून आपल्या क्षमतांमध्ये वाढ होते, हे पहिल्यांदा आपण समजून घेतले पाहिजे.



म्हणून स्वयंचलित शिक्षण हे माणसाच्या क्षमतेमध्ये वाढ करून घेण्यासाठी समजून घेणे आवश्यकआहे. हे शिक्षण प्रत्यक्षांत आणण्यासाठी पालक म्हणून आपल्याला सहा मूळ पायऱ्या समजून घ्याव्या लागतात. या पायऱ्या या विषयात साठ वर्षे संशोधन करून पीटर ग्रे या संशोधकाने मांडल्या आहेत,. त्या पायऱ्या आहेत.

१ जबाबदारी - शिक्षण हि कुणाची जबाबदारी आहे? हे स्पष्ट असणे.
२. मुलांनी ठरवलेले खेळ खेळण्यासाठी अमर्यादित वेळ देण्याची "मानसिक" तयारी करणे 
३. आजूबाजूच्या जगात जगण्यासाठी आवश्यक साधनांशी (tools of culture)  खेळण्याची अमर्यादित संधी देण्याची "मानसिक तयारी" करणे  जसे की कम्प्युटर्स
४. मुलांना लेबल न लावता त्यांच्या शंकांना उत्तर देणारे किंवा "शिकवणारे" मदतनीस उपलब्ध करून देणे 
५. मुले विश्वासाने वावरू शकतील अशा तणावरहित जागा किंवा भवताल निर्माण करणे 
६. वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांना एकत्र येण्याची संधी निर्माण करणे 

यातील प्रत्येक गोष्ट व्यवहारात अनंत येईल का? हे मी इथून पुढच्या भागात मांडणार आहे, त्यासाठी या लेखनाबरोबरच तुम्ही युट्युब व्हिडियो सुद्धा जरूर बघा.


Comments

Popular posts from this blog

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...