या पुस्तकाविषयी अजून जाणून घेण्यासाठी हा युट्युब व्हिडियो नक्की बघा.
अकरावी हा सगळ्याच मुलांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असतो. पुढे जाऊन नक्की काय करायचं याचा निर्णय या वर्षी प्रत्येक मुलाला आणि त्याच्या पालकांना घ्यावाच लागतो. काही जण याची तयारी अगदी आठवी नववीपासूनच सुरु करतात. हा निर्णय शक्यतो ऍप्टिट्यूड टेस्ट, वेगवेगळे क्लासेस, पालकांशी होणारी चर्चा व त्या त्या काळात बूम असणारी करिअर्स यांचा विचार करून घेतला जातो.
हे सगळं करून निर्णय घेतल्यानंतर, भरपूर यश मिळवल्यानंतर, चांगल्या पगाराची नोकरी मिळवल्यानंतर तीन चार वर्षे काम केल्यावर अनेकजणांना मग त्यांना "नक्की काय आवडत आणि काय केलं पाहिजे?" याचा शोध लागतो! जे नशीबवान असतात, चांगले आर्थिक पाठबळ असते ते बिनधास्त एका फिल्ड मधून दुसऱ्या फिल्डमध्ये स्विच होतात. मात्र बहुसंख्य मंडळी होमलोनच्या भीतीने विकेंडची वाट बघत दिवस ढकलत राहतात आणि कामातून सुख व समाधान मिळत नाही म्हणून समाधान मिळवण्यासाठी "विविध पर्याय" शोधात राहतात,
या सगळ्यात आयुष्यातील महत्वाची वर्षे निराशेत जाण्याचा धोका असतो. मला स्वतःच्या आयुष्याचा विचार केला तर हे जाणवत की मला नक्की कशाची आवड आहे हे जॉब करताना मी जेव्हा प्रत्यक्ष काम केले किंवा इतरांना काम करताना बघितले, तेव्हाच मला समजले! जर मला दहावीनंतर हे सगळं बघायला अनुभवायला मिळालं असत तर कदाचित माझ्या आयुष्यातील महत्वाची उमेदीची वर्ष वाया गेली नसती. त्यासाठी मी दहावीनंतरच एक वर्ष हे अनुभव घेण्यात घालवल असत, तरी मला परवडलं असत!
मी आणि आपल्यापैकी अनेकजण हे करू शकले नसले तरी एका मुलाने मात्र हे करून दाखवले आहे, त्याच नाव आहे राहुल. गोव्यात राहणाऱ्या या मुलाने दहावी झाल्यावर चक्क एक वर्ष ब्रेक घेतला आणि पुढं जाऊन आपल्याला काय करायचं आहे? हे ठरवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्याचा व प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याचा त्याने निर्णय घेतला.
या वर्षभरात त्याला जे अनुभव आले, त्या अनुभवांवर आधारित त्याने "शाळेपासून मुक्ती - एक वर्षापुरती" हे अतिशय रंजक पुस्तक लिहिले आहे. नुकतीच दहावी झालेली, जेमतेम सोळा वर्षाचा हा मुलगा. या मुलाला एकट्याला अशी भटकंती करायची परवानगी देणं त्याच्या पालकांसाठी नक्कीच कठीण होतं.
मग त्याने सुरुवातीला घराजवळील मत्सालय, अळंबी तयार करण्याची कार्यशाळा नंतर सेंद्रिय शेती समजून घेण्यासाठी वडिलांबरोबर गोव्याची सहल असा आत्मविश्वास गोळा करून राहुलने सापांची माहिती व सहवास अनुभवण्यासाठी गोव्यातून एकट्याने थेट पुण्याचे सर्पोद्यान गाठले.
त्यानंतर राहुलने चेन्नईचे गांडूळ संशोधन केंद्र, ममलापुरमचे मगर प्रजनन केंद्र अशा अनेक ठिकाणी भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी दोन तीन आठवडे राहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला, त्यानंतर बेंगळुरूमध्ये वनक्षेत्राशी संबंधित अनेक तज्ज्ञांच्या भेटी घेतल्या,. एवढ्या दिवसात कमावलेल्या अनुभवांच्या जीवावर एका जंगलाचे सर्वेक्षण देखील केले!
या पुस्तकामध्ये प्रत्येक अनुभव अतिशय सविस्तरपणे मांडला आहे. हे एक वर्ष राहुलला आयुष्यभरासाठी उपयोगी पडले हे वेगळे सांगायला नकोच. आज राहुल एक यशस्वी वाईल्ड लाईफ गाईड, फोटोग्राफर व लेखक आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे एका वर्षापुरती शाळेपासून मुक्ती घेतल्याने त्याला आयुष्यभरासाठी निराशेपासून मुक्ती मिळाली आहे!
आपल्याला कदाचित असं वर्षभर मुक्ती घेणं जमणार नाही. मात्र आपण जर मुले आठवी नववीत गेल्यानंतर त्यांना असे प्रत्यक्ष अनुभव द्यायला व त्या त्या क्षेत्रातील लोकांना भेटायची संधी दिली तर मला वाटत की या मुलांना करिअरच्या निर्णायक टप्प्यावर पुढची दिशा ठरवताना कसलीच अडचण येणार नाही.
ज्यांची मुलं पुढील करिअर निवडण्याच्या निर्णायक टप्प्यावर आहेत अशा पालकांनी व मुलांनी हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे.
पुस्तकांचे नाव: शाळेपासून मुक्ती - एका वर्षापुरती
लेखक - राहुल अल्वारिस
प्रकाशन - मनोविकास
सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध
तसेच पुढील लिंकवर देखील उपलब्ध आहे. मात्र हे पुस्तक तुम्ही विकत घेऊन वाचावे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे.
http://www.arvindguptatoys. com/arvindgupta/rahulalvares. pdf
चेतन एरंडे.
आपल्याला कदाचित असं वर्षभर मुक्ती घेणं जमणार नाही. मात्र आपण जर मुले आठवी नववीत गेल्यानंतर त्यांना असे प्रत्यक्ष अनुभव द्यायला व त्या त्या क्षेत्रातील लोकांना भेटायची संधी दिली तर मला वाटत की या मुलांना करिअरच्या निर्णायक टप्प्यावर पुढची दिशा ठरवताना कसलीच अडचण येणार नाही.
ज्यांची मुलं पुढील करिअर निवडण्याच्या निर्णायक टप्प्यावर आहेत अशा पालकांनी व मुलांनी हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे.
पुस्तकांचे नाव: शाळेपासून मुक्ती - एका वर्षापुरती
लेखक - राहुल अल्वारिस
प्रकाशन - मनोविकास
सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध
या पुस्तकाविषयी अधिक माहिती पुढील युट्युब व्हिडियोमध्ये देखील उपलब्ध आहे.
तसेच पुढील लिंकवर देखील उपलब्ध आहे. मात्र हे पुस्तक तुम्ही विकत घेऊन वाचावे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे.
http://www.arvindguptatoys.
चेतन एरंडे.
Comments
Post a Comment