सर्जनशील पालक समूहातील गेले दोन महिने स्वतःहून प्रोग्रामिंग शिकत असलेल्या मुलांनी ३० मे २०२० रोजी अमेरिकेतील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेसमोर त्यांची शिकण्याची प्रक्रिया सादर केली. या वेळी या मुलांनी नक्की काय सांगितले हे समजून घेण्यासाठी ही ब्लॉग पोस्ट नक्की वाचा. मुलांना जबाबदारी द्यावी का? या प्रश्नाविषयी पालकांच्या मनात अनेक शंका असतात आणि ते अत्यंत साहजिकही आहे. मात्र मुलांना जबाबदारी न देताच, त्यांच्या जबाबदारी घेण्याच्या क्षमतेविषयी शंका निर्माण करणे हे मात्र चुकीचे आहे, पुण्यातील सर्जनशील पालक समूहातील पालकांनी मात्र ही चूक करायची नाही असा सर्जनशील निर्णय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये घेतला. कोरोनामुळे मुलांना सक्तीने घरात बसण्याची वेळ आली होती. अशा वेळी मुलांनी काय करायचे हे पालकांनी न ठरवता मुलानांच ठरवू देण्याचा सर्जनशील निर्णय समूहातील पालकांनी घेतला. मुलांना हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुलांनी काय केले असेल? सगळ्यात आधी ही सगळी मुलं ऑनलाईन एकत्र आली. काय करायचे याचा निर्णय सगळयांनी मिळून घ्यावा असे ठरले आणि मग वेगवेगळ्या आयडिया स...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.