Skip to main content

Posts

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

स्व अध्ययन -  आनंदी व समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली. 

माणसाला किंवा खरं तर कोणत्याही सजीवाला सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती? याचा शोध घेतला तर निर्विवादपणे एकच उत्तर येईल, ते म्हणजे "स्वातंत्र्य".   प्रत्येक सजीव जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करून आनंदाने, समाधानाने तेव्हाच जगू शकतो, जेव्हा तो त्याचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असतो. माणसाच्या सातत्याने चालणाऱ्या संघर्षाचे मूळ जर आपण बघितले, तर ते त्याच्या स्वातंत्र्याच्या झालेल्या संकोचात सापडते.   माणूस त्याच्याही नकळत कधी गरजा वाढवून ठेवल्याने, खऱ्या गरजा ओळखता न आल्याने आर्थिक, सामाजिक पारतंत्र्यात अडकत जातो. नोकरीतून स्वातंत्र्य हवे असते पण कर्जाचे हप्ते बेडीचे काम करतात,  शहरातील दगदगीने मन आणि शरीर थकून जाते, त्याला निसर्गातील मोकळ्या वातावरणाची ओढ लागते पण पुन्हा एकदा, नोकरी, व्यवसाय आणि मुलांच्या शिक्षणाच्या बेड्या आड येऊन, माणसाचे स्वातंत्र्य हिरावले जाते.  माणसाच्या आयुष्यात घडणारे असे सगळे संघर्ष स्वातंत्र्य नसल्यानेच निर्माण होतात, हे नक्की.  माणसाला शाश्वत समाधान व सुख मिळवून देऊ शकेल अशा स्वातंत्र्याचा पाया हा शिक्षणात आहे, असे मला वाटते. हे ...

मुलांशी काय बोलायचं? भाग २

मागच्या भागात आपण मुलांशी संवाद सुरु करायला मदत करतील अशा पाच गोष्टींची माहिती करून घेतली होती.  आज या दुसऱ्या व शेवटच्या भागात आपण पुढच्या पाच गोष्टींची माहिती करून घेऊ.  ६. असे कोणते प्रसंग आहेत, ज्यामध्ये तू "आऊट ऑफ कंट्रोल" होतोस असं तुला वाटतं?  हे असं आऊट ऑफ कंट्रोल होणं हे अनेकदा मुलांनाही आवडत नाही. पण असे जर प्रसंग जर आपल्याला कळाले तर आपण अशा वेळी भावना नियंत्रित कशा कराव्यात, यासाठी त्यांची मदत करू शकू.  ७. तुझ्यामध्ये कोणती "बेस्ट क्वालिटी" आहे असं तूला वाटतं?  आपण असं मानतो की प्रत्येक मूल हे "युनिक" आहे. हा युनिकनेस शारीरिक ठेवणीमुळे जसा येतो तसा व्यक्तिमत्वातल्या पैलूंनी सुद्धा येतो! मुलांशी संवाद करता करता मुलांना  स्वतःच्या अंगभूत क्षमतांविषयी आणि कौशल्यांविषयी काय वाटते हे समजून घेऊन, ती कौशल्ये व क्षमता स्वतःच्या आणि जगाच्या चांगल्यासाठी कशा वापरता येतील, याविषयी आपण त्यांना मदत करू शकतो.  ८ एखादी गोष्ट तुला सोडून द्यावीशी वाटते, तेव्हा तू तुझ्या मनाला काय सांगतोस?  मुलांची धरसोड वृत्ती हा अनेक पालकांच्या चिंतेचा ...

मुलांशी काय बोलायचं? भाग १

  मुलांशी काय बोलायचं? भाग १  मला आठवतंय मी होमस्कुलिंग म्हणजे काय? या विषयांवर बोलण्यासाठी एका पालक गटाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे मला एका पालकांनी विचारलेला प्रश्न आश्चर्यचकित करणारा होता. तो म्हणजे "होमस्कुलिंग करता म्हणजे तुमचं मूल सारखं तुमच्या डोळ्यासमोर असणार. मग तुम्हाला ते "इरिटेट" होत नाही का? सारखं त्याच्याशी बोलत राहण्याचा कंटाळा येत नाही का? आमचं मूल सुट्टीच्या दिवशी घरी असलं तरी त्याच्याशी सारखं काय बोलायचं हा प्रश्न पडतो? मग तुम्ही नक्की बोलता तरी काय?"  त्यावेळी मी या प्रश्नाला फक्त हसून उत्तर दिलं! आपल्या मुलाशी काय बोलायचं, असा प्रश्न पालकांना पडत असेल का? हा विचार मनात तेव्हापासून घोळत असताना मला काही दिवसांपूर्वी रिबेका रोलंड यांनी लिहिलेल्या "थी आर्ट ऑफ टॉकिंग विथ चिल्ड्रेन" या नावाच्या एका पुस्तकाविषयी कळलं. मी हे पुस्तक पूर्ण वाचलेलं नसलं तरी या पुस्तकात मुलांशी काय बोलावं याविषयीच्या टिप्स मला वाचायला मिळाल्या, त्या सोप्या करून इथे मांडायचा मी प्रयत्न करतोय.  १. तू मला काय शिकवशील?  या वाक्याने मुलांशी संवादाला सुरुवात करू...

वेध होमस्कुलिंगचे - भाग २ - आपले स्टेकहोल्डर्स व आजूबाजूचे वातावरण

होमस्कुलिंगच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी, "होमस्कुलिंग करण्याचे नक्की कारण" आपल्याला माहिती असले पाहिजे, हे आपण मागील भागात बघितले. हे कारण शोधत असताना, आमच्या अनुभवावरून मी असे सांगू शकतो की होमस्कुलिंगचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा विनियोग करण्याची अत्यंत महत्वाची ताकद आपल्याला मिळते. त्याचबरोबर वेळेचे नियोजन मुलांच्या कलाने करून, त्यांची ऊर्जा, शिक्षणाची साधने व पद्धत ठरवण्याचे महत्वपूर्ण स्वातंत्र्य आपल्याला मिळते. यामुळे मुलांचे केवळ पुस्तकी शिक्षण न होता एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मुलांना सर्वांगीण शिक्षण मिळवण्याची संधी आपण देऊ शकतो. आता आपल्याला होमस्कुलिंग का करायचे याचे उत्तर शोधता आले की आपल्याला जो पुढचा प्रश्न घ्यायचा आहे तो म्हणजे आपले स्टेकहोल्डर्स कोण आहेत, म्हणजेच या निर्णयाचा परिणाम कुणावर होऊ शकतो आणि या निर्णयावर परिणाम कोण करू शकतात यांची यादी तयार करणे. या यादीत आपण स्वतः, मूल, आपले नातेवाईक, कदाचित शेजारी, मूल शाळेत जात असेल तर त्याची सध्याची शाळा, स्कुल व्हॅन चालक, मुलाचे मित्र, मुलगा होमस्कुलिंग करू लागल्यावर, ओपन स...

वेध होमस्कुलिंगचे - भाग १ - होमस्कुलिंग का?

  साधारणपणे मे महिन्यापासून होमस्कुलिंग विषयी चौकशी करणाऱ्या पालकांची संख्या वाढू लागते. गेले वर्षभर माझा एकूणच सोशल किंवा एकूणच मीडियावरचा वावर कमी झाल्याने, फोन येण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी तुरळक फोन्स अजूनही येत असतात. होमस्कुलिंग सुरू करताना, पालकांच्या मनात अनेक प्रश्न असणे स्वाभाविक आहे. होमस्कुलिंग करण्याचा निर्णय घेण्यापर्यंत जेव्हा पालक येतात याचाच अर्थ प्रचलित शिक्षणव्यवस्थेने त्यांच्यापुढे असे काही प्रश्न उभे केले आहेत, ज्यांची उत्तरं आता व्यवस्थेबाहेर येऊनच शोधावी लागणार आहेत. ८ वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा व्यवस्थेच्या बाहेर पडलो तेव्हा आम्ही बेसिक पूर्वतयारी केली असली तरी आज ज्या प्रमाणात रिसोर्सेस, माहिती आणि माहिती देण्याची तयारी असलेले पालक आहेत, तेव्हढे तेव्हा नव्हते. त्यामुळे आता जे पालक होमस्कुलिंगचा निर्णय घेण्यापर्यंत आले आहेत, त्यांना या मार्गावर चालण्यासाठी अगदी हमरस्ता जरी नसला तरी किमान भरवश्याची पायवाट नक्की तयार झाली आहे. त्यामुळे पालकांनी हा निर्णय घेताना जर थोडीशी पण योग्य तयारी केली तर त्यांचा पुढचा प्रवास आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा होईल हे नक्की...