कोरोना के साथ भी - कोरोना के बाद भी मुलांना वेळ द्यायचा म्हणजे नक्की काय करायचे? भाग ४ पालकत्वावरील कोणत्याही पुस्तकात, भाषणात आणि गप्पातपालकांना हमखास दिला जाणारा सल्ला म्हणजे, "मुलांना वेळ दिला पाहिजे!" आजकालच्या धकाधकीच्या जीवनात "आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही" याची टोचणी सतत मनाला असताना, "मुलांना वेळ दिला पाहिजे" असं कुणी म्हणालं की का कुणास ठाऊक पणअजूनच ओशाळल्यासारखे होते! त्यात अजून भर म्हणजे, सध्या कोरोनाच्या काळात घरून काम करत असून सुद्धा आपण, मुलांना वेळ देऊ शकत नाही ही भावना अजूनच जास्तच तीव्रतेने छळू लागते! आजच्या भागात पालकांनी मुलांना वेळ द्यायचा म्हणजे नक्की काय करायचं याविषयी युनिसेफ या मुलांसाठी जगभर काम करणाऱ्या संस्थेचे मत काय आहे, हे आपण समजून घेणार आहोत. आपण आपली "प्रोफेशनल" कामे करत असताना ज्याप्रमाणे प्रत्येक कामासाठी "ठरवून" वेळ काढतो, अगदी तसेच आपण आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी "ठरवून" किमान २० मिनिटे तरी रोज वेळ काढलाच पाहिजे. आपण दिवसभरात कमीत कमी १६ तास म्हणजे ९६० मिनिटे जागे असतो, त्यापैकी केवळ २...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.